निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! देशातील ''या'' ६ राज्यांत SSR प्रक्रिया राबवणार; पाहा राज्यांची यादी
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! देशातील ''या'' ६ राज्यांत SSR प्रक्रिया राबवणार; पाहा राज्यांची यादी
img
Nandini khandare More
देशातील मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आणखी सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण  प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेंतर्गत नव्या मतदारांची नोंदणी, नावातील चुका दुरुस्ती आणि मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे नेमकी कोणत्या सहा राज्यांचा यात समावेश आहे आणि SSR प्रक्रिया कधीपासून सुरू होणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

SIR प्रक्रियेला विरोध, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलाय. देशातील सहा राज्यात SSR प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या राज्यांमध्ये २१ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

भारतीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख मानून, ६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्विलोकनासाठी आदेश जारी केलाय. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, एसएसआर प्रक्रिया खालील ६ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, चंडीगड, दादरा नगर हवेली-दीव दमण, मिझोराम, ओडिशा, सिक्किम यांचा समावेश आहे.

तरुणांना आगाऊ अर्ज करण्याची संधी आयोगाच्या म्हणण्यानुसार, या पुनरीक्षण मोहिमेत जे तरुण भविष्यात मतदान करणार आहेत, त्यांना आपले नाव नोंदवण्याची संधी आहे. जे व्यक्ती १ एप्रिल, १ जुलै किंवा १ ऑक्टोबर २०२७ रोजी १८ वर्षांच्या पूर्ण होत आहेत, त्या आतापासूनच आगाऊ अर्ज सादर करू शकतील. यामुळे नवीन मतदारांचा मतदार यादीत वेळेवर समावेश करणे सुलभ होईल. या महत्त्वपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जावीत.

जेणेकरून मतदार यादी पुनरीक्षणाचे काम वेळेवर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ शकेल, असे निर्देश सुचना निवडणूक आयोगाने संबंधित सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, एसएसआर प्रक्रिया ज्या सहा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, चंडीगड, दादरा नगर हवेली-दीव दमण, मिझोराम, ओडिशा, सिक्किम यांचा समावेश आहे. या प्रक्रियेअंतर्गत १ जानेवारी २०२७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातील.

 यासह १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२७ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे तरुण आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आगाऊ अर्ज करू शकतील. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन पुनरिक्षण प्रक्रिया सुरू आहे. तेथील SSR वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. यामध्ये आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, दिल्ली, त्रिपुरा आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन एसएसआरच्या तारखा नंतर ठरवल्या जाणार आहेत.'

संपूर्ण एसएसआर वेळापत्रक: मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण - २० नोव्हेंबर, २०२६ - एकात्मिक मसुदा मतदार यादीचे प्रकाशन - ३० नोव्हेंबर, २०२६ - दावे आणि आक्षेप कालावधी - ३० नोव्हेंबर, २०२६ ते ३० डिसेंबर, २०२६ - अंतिम मतदार यादीचे प्रकाशन - २१ जानेवारी, २०२७
SIR |
इतर बातम्या
Join Whatsapp Group