आता शेवटची संधी ! मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ''या'' तारखेपर्यंत मुदत वाढ
आता शेवटची संधी ! मतदार यादीत नाव नोंदणीसाठी ''या'' तारखेपर्यंत मुदत वाढ
img
Nandini khandare More
मतदार यादीत नाव नोंदणी आणि दुरुस्ती करण्यासाठी (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र नागरिकांना १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान पात्र विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे, तर औद्योगिक आस्थापनांमध्ये १२ ऑक्टोबरपर्यंत जागृती उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदारांना घाबरून तहसील कार्यालयात गर्दी न करता बीएलओशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. विशेष शिबिरांचा आणि ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्या, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी सांगितले.

प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांची बीएलओकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जात आहे. पात्रता निश्चित झाल्यानंतर संबंधित नागरिकांकडून नमुना क्रमांक ६ भरून घेतला जात आहे. गृहभेटीदरम्यान घरी उपलब्ध नसलेल्या नागरिकांसाठी १० आणि ११ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group