१ डिसेंबर २०२६ पासून नवीन महिना सुरू होताच सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींपासून ते बँकिंग नियम, कर्जाचे व्याजदर आणि आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक बाबींवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरखर्चाचं बजेट आखण्यापूर्वी हे नवे नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नेमके कोणते बदल होणार? तुमच्या खिशावर किती परिणाम होणार? जाणून घेऊया सविस्तर...
एक प्रकारे सामान्य नागरिकांच्या आयुष्यात हाहा:कारच उडणार आहे. क्रेडिंट कार्डमधून पेमेंट, गॅस सिलिंडरच्या किमती आणि गुंतवणुकीशी संबंधित नियमांमध्ये बदल होण्याचे या निमित्ताने संकेत मिळत आहेत. त्यामुळे महिन्याच्या पहिल्याच दिवशी होणारे हे बदल सर्वांनी ध्यानात घेणं आवश्यक आहे. खर्च आणि गुंतवणुकीचं प्लानिंग करण्यासाठी ही माहिती असणं आवश्यक आहे.
1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्डचे नियम बदलणार
SBI कार्डधारकांना 1 डिसेंबरपासून काही खास देवाणघेवाणीवर एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे. नव्या नियमानुसार, जर एखादा ग्राहक एकावेळी 30,000हून अधिक ट्रान्सपोर्ट पेमेंट करणार असेल तर त्याला त्यावर 1 टक्के शुल्क आणि टॅक्स लागू होईल. फ्यूलबाबत जर एका बिलिंग सायकलमध्ये एकूण खर्च 50,000 रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला तर संपूर्ण फ्यूल खर्चावर एक टक्क्याहून अधिक चार्ज द्यावा लागणार आहे. म्हणजे निर्धारीत लिमिटच्या वरील खर्चावर नाही, तर संपूर्ण फ्यूल बिलावर हे शुक्ल आकारले जाणार आहे.
RBI व्याज दर वाढवणार
भारतीय रिझर्व्ह बँकच्या मौद्रिक नीती समितीची बैठक 2 ते 4 डिसेंबरपर्यंत होईल. या बैठकीत रेपो रेटची समीक्षा केली जाईल. ऑक्टोबरमध्ये आरबीआयने रेपो रेट 0.25 टक्के वाढवून 5.50 टक्के केला होता. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.
लोन आणि एफडीत बदल
आरबीआयने रेपो रेट वाढवला तर त्याचा परिणाम बँकेच्या व्याज दरांवर पडण्याची शक्यता आहे. बँक होम लोन आणि दुसरे फ्लोटिंग रेटवाल्या कर्जावर व्याज वाढवू शकते. त्यामुळे ग्राहकांचा ईएमआय वाढू शकतो वा लोन चुकवण्याचा अवधी वाढू शकतो.
एफडीत गुंतवणूक करण्यासाठी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण बँक नव्या फिक्स्ड डिपॉजिटवर ज्यादा व्याज देण्याचा निर्णय घेऊ शकते. दरम्यान, एफडी आणि लोनच्या व्याज दरात बदल करण्याचा निर्णय गरज आणि बाजाराच्या स्थितीवर बँक घेण्याची शक्यता आहे.
आधाराशी ईमेल अपडेटचा नियम
UIDAI ने आधार कार्डमध्ये ईमेल आयजी संलग्न करणे वा अपडेट करण्यासाठी लागणारे 75 रुपये शुल्क माफ केलं आहे. ही सुविधा 31 डिसेंबरपर्यंत मिळणार आहे. याचा लाभ अधिकृत आधार मोबाईल अॅपद्वारे ईमेल अपडेट केल्यावरच मिळणार आहे. जर तुम्हाला आधारमध्ये नवीन ईमेल अॅड्रेस जोडायचा असेल वा जुना मेल आयडी बदलयाचा असेल तर 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही हे काम पूर्ण करू शकता. त्यानंतर मामूली शुल्क आकारलं जाणार आहे.
सिलिंडरचे भाव बदलणार
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला सराकरी तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये फेरफार करतात. त्याचप्रमाणे 1 डिसेंबर रोजी घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल होणार आहे. खासकरून 19 किलोवाल्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार असून त्यानंतर हॉटेल आणि रेस्टारंट व्यावसायिक काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, 14.2 टक्के घरगुती सिलिंडरचे दर स्थिर राहिल्यास किंवा वाढल्यास त्याचा परिणाम थेट सामान्य कुटुंबावर होणार आहे.