धक्कादायक ! ''या'' प्रसिद्ध अभिनेत्याला पॉक्सो प्रकरणात १ वर्षाचा कारावास ; नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक ! ''या'' प्रसिद्ध अभिनेत्याला पॉक्सो प्रकरणात १ वर्षाचा कारावास ; नेमकं प्रकरण काय?
img
Nandini khandare More
चित्रपटसृष्टीतून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्याला पॉक्सो प्रकरणात न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०२२ मध्ये अल्पवयीन मुलांशी संबंधित एका प्रकरणामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं? अभिनेत्याविरोधात कोणते आरोप करण्यात आले होते? जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.

 मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीजित रवी याला अल्पवयीन मुलांशी संबंधित पॉक्सो प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात त्रिशूर येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाने त्याला एक वर्षाच्या सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. २०२२ मध्ये घडलेल्या एका घटनेशी संबंधित हे प्रकरण असून, अभिनेत्याने अल्पवयीन मुलांसमोर अश्लील कृत्य केल्याचा आरोप होता.

एका वृत्तानुसार ४ जुलै २०२२ रोजी ही घटना घडली होती. काही अल्पवयीन मुले शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी परतत होती. ही मुले ज्या अपार्टमेंट परिसरात राहत होती, त्याच ठिकाणी अभिनेता श्रीजित रवीने त्यांच्यासमोर आपले प्रायव्हेट पार्ट उघड केल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकेच नव्हे, तर त्याने मुलांना धमकावल्याचाही आरोप होता. या घटनेनंतर संबंधित मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. या प्रकरणात अल्पवयीन मुलांशी संबंधित लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देणाऱ्या पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

त्रिशूर येथील फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या न्यायाधीश रेम्या मेनन यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. न्यायालयाने श्रीजित रवी याला भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९ आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ११(i) अंतर्गत दोषी ठरवले. त्यानुसार त्याला एक वर्षाच्या सक्तमजुरीच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.जर अभिनेत्याने हा दंड भरला नाही, तर त्याला अतिरिक्त एक महिना सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.

अपील करण्यासाठी न्यायालयाकडून एक महिन्याची मुदत न्यायालयाचा निकाल आल्यानंतर श्रीजित रवी याने केरळ उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने त्याच्या शिक्षेला एक महिन्यासाठी स्थगिती दिली आणि जामीन मंजूर केला. ५० हजार रुपयांचा वैयक्तिक बॉण्ड आणि दोन सक्षम जामीनदारांच्या अटीवर त्याला जामीन देण्यात आला आहे. तसेच २३ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group