दारूच्या किमतीत मोठी कपात! ३३ विदेशी ब्रँड झाले स्वस्त; तब्बल ५० टक्क्यांपर्यंत दर कमी
दारूच्या किमतीत मोठी कपात! ३३ विदेशी ब्रँड झाले स्वस्त; तब्बल ५० टक्क्यांपर्यंत दर कमी
img
Nandini khandare More

मद्याच्या किमतीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल ३३ विदेशी ब्रँडच्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. काही ब्रँडच्या किमतीत ५० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचा दावा केला जात आहे. नेमका हा निर्णय काय आहे, कोणत्या ब्रँडच्या किमती कमी झाल्या आणि या दरकपातीमागचं कारण काय? जाणून घेऊया या बातमीतून.

भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या मुक्त व्यापार करार अंतर्गत 33 विदेशी मद्याच्या ब्रँडची किंमत थेट अर्ध्यावर आली आहे. स्कॉच, व्हिस्की या सारख्या महागड्या मद्याच्या ब्रँडवरील आयात शुक्ल 150 टक्क्यावरून कमी करून 75 टक्के करण्यात आलं आहे. आयात शुल्क कमी होताच उत्पादन शुल्क विभागाकडून नवी सूची जारी करण्यात आली आहे. छत्तीसगड सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता छत्तीसगडमध्ये महागड्या ब्रँडची दारू थेट अर्ध्या किंमतीमध्ये मिळणार आहे. नवे दर लागू होताच जॉनी वॉकरच्या 18 ईयरच्या एका केसची किंमत जवळपास 5 हजार रुपयांनी कमी झाली आहे.

कोणत्या ब्रँडचे दर कमी झाले?

छत्तीसगड सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये उरलेल्या महिन्यांसाठी जे मद्य थेट विदेशामधूनच बाटलीबंद होऊन भारतामध्ये येते त्यावरील आयात शुक्ल 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण 33 प्रीमियम दारूच्या ब्रँडचा समावेश आहे. यामध्ये जॉनी वॉकर, चिवास रीगल, रॉयल सॅल्यूट, ग्लेनलिवेट, ड्यूअर्स, बॉलेंटाइन आणि सिंगलटन सारख्या 33 ब्रँडचा समावेश आहे.

मुक्त व्यापार कराराअंतर्गत स्कॉच व्हिस्कीवर लावण्यात आलेलं आयात शुल्क 150 टक्क्यांवरून थेट 75 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलं आहे. आयात शुल्कात केलेल्या कपातीचा थेट परिणाम हा 33 विदेशी मद्यांच्या ब्रँडवर झाला आहे. याच आधारावर आता छत्तीसगड सरकारने विदेशी मद्याच्या ब्रँडचे दर देखील कमी केले आहेत. दरांमध्ये थेट 50 टक्के कपात करण्यात आली आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या या मुक्त व्यापार कराराचा उद्देश व्यापाराला चालना देणं आहे. ज्यामुळे दोन्ही देशांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. याचाच एक भाग म्हणून आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलं आहे.

दरम्यान आयात शुल्क कमी करण्यात आल्यामुळे आता 33 विदेशी मद्यांचे ब्रँड मद्यप्रेमींना अर्ध्या किंमतीमध्ये मिळणार आहेत. यामुळे आता मद्याच्या विक्रीमध्ये देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारच्या वतीने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group