IND vs NZ: टीम इंडियाची निराशा! विजयाच्या उंबरठ्यावर असताना सामना ड्रॉ
IND vs NZ: टीम इंडियाची निराशा! विजयाच्या उंबरठ्यावर असताना सामना ड्रॉ
img
Nandini khandare More
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. पहिल्या डावात भारताने ७२० धावांवर डाव घोषित करत न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, पाचव्या दिवशी डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ५ बाद २३९ धावा केल्या आणि सामना ड्रॉ झाला. त्यामुळे विजयाच्या जवळ पोहोचलेल्या टीम इंडियाला समाधान मानावे लागले. 

न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी भारतीय गोलंदाजांचा सामना करत शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिले. सामन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी भारताला विजयासाठी न्यूझीलंडचे आठ विकेट्स घ्यायचे होते. पण यावेळी टीम इंडियाला केवळ तीन विकेट्स मिळवता आले. मिचेल आणि फिलिप्स यांच्या पार्टनरशिपमुळे न्यूझीलंडने सामना ड्रॉ केला.

न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 रन्स केले होते. त्यानंतर टीम इंडियाने पहिला डाव 9 विकेट्स गमावत 720 रन्सवर घोषित केला. त्यामुळे भारताला न्यूझीलंडवर 352 रन्सची मोठी आघाडी मिळाली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 2 विकेट्स गमावत 119 रन्स केले. शेवटच्या दिवशी न्यूझीलंडची टीम भारताच्या स्कोरपेक्षा 233 रन्सने मागे होता. भारताला विजय मिळवण्यासाठी न्यूझीलंडचा ऑलआऊट करणं गरजेचं होतं. पण भारतीय गोलंदाजांना त्यात यश आलं नाही. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 5 विकेट्स गमावत 239 रन्स केले. डॅरिल मिचेल 49, तर ग्लेन फिलिप्स 26 रन्सवर नाबाद राहिले.

भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला विकेट्स मिळवल्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. न्यूझीलंडचा स्कोरमध्ये 13 रन्सची भर पडली असतानाच वॉशिंग्टन सुंदरने डेव्हॉन कॉनवेला आऊट केलं. विकेटकीपर ऋषभ पंतने त्याचा कॅच पकडला. कॉन्वेने 165 चेंडूंचा सामना करत 7 चौकारांच्या मदतीने 65 रन्स केले.

यानंतर न्यूझीलंडचा स्कोर 139 असताना प्रसिद्ध कृष्णाने रचिन रवींद्रला आऊट केलं. केएल राहुलने त्याचा अप्रतिम कॅच पकडला. रवींद्रने 129 चेंडूंमध्ये 4 चौकारांच्या मदतीने 37 रन्स केले. भारताला पाचवी विकेट अंशुल कंबोजने मिळवून दिली. त्याने टॉम ब्लंडलला आऊट केलं. न्यूझीलंडचा स्कोर 176 असताना ही विकेट मिळाली. कंबोजच्या गोलंदाजीवर चेंडू ब्लंडलच्या बॅटची कट लागली आणि चेंडू थेट पंतच्या हातात गेला. पण पंतला झेलबाबत पूर्ण खात्री नव्हती. त्यानंतर कंबोजच्या सांगण्यावरून कर्णधार शुभमन गिलने रिव्ह्यू घेतला. हा रिव्ह्यू भारताच्या बाजूने लागला आणि ब्लंडलला आऊट करार दिला. मिचेल आणि फिलिप्सची भक्कम पार्टनरशिप ब्लंडलची विकेट मिळाल्यानंतर भारताला विजयासाठी आणखी पाच विकेट्सची गरज होती. पण त्यानंतर डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांनी भारतीय गोलंदाजांसमोर मोठं आव्हान उभं केलं. दोघांनीही संयमाने फलंदाजी केली आणि विकेट पडू दिल्या नाहीत.

टीम इंडियाने विजय मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. जसप्रीत बुमराहसह इतर गोलंदाजांनीही जोर लावला. पण मिचेल आणि फिलिप्स यांना आऊट करण्यात कोणालाही यश आलं नाही. या दोघांनी अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहत न्यूझीलंडला पराभवापासून वाचवलं. मिचेल आणि फिलिप्स यांच्यात 43 ओव्हर्समध्ये 63 रन्सची नाबाद पार्टनरशिप झाली. मिचेलने 186 चेंडूंचा सामना करत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 49 रन्स केले. तर फिलिप्सने 126 चेंडू खेळत 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 26 रन्स केले. या दोघांच्या खेळीमुळे वेलिंग्टन टेस्ट सामना ड्रॉ झाला.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group