आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी मूल्यांकन वर्ष २०२६-२७ अंतर्गत ऑडिट लागू असलेल्या विशिष्ट करदात्यांना ITR दाखल करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०२६ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे रिटर्न भरताना कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे. उत्पन्नाची माहिती, TDS आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील यांची पडताळणी करणे महत्त्वाचे ठरते. नेमकी कोणती तीन कामं करायची? मुदत चुकल्यास किती दंड भरावा लागू शकतो? जाणून घ्या.
ऑडिट अंतर्गत येणाऱ्या कंपन्या, LLP आणि इतर करदात्यांना आयटीआर दाखल करण्यासाठी आता २१ नोव्हेंबर २०२६ ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. कारण आयटीआर भरताना एखादी छोटी चूक झाली, तरी पुढे दंड किंवा व्याज भरावं लागू शकतं. त्यामुळे रिटर्न दाखल करण्याआधी तीन महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्या.
1. टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि UDIN तपासा आयटीआर भरण्याआधी तुमचा टॅक्स ऑडिट रिपोर्ट वैध UDIN सोबत सादर झाला आहे का हे तपासा. ऑडिटनंतर कलम 43B अंतर्गत पेमेंटमध्ये बदल झाल्या असेल तर नियम 6G नुसार ऑडिट रिपोर्टमध्ये महत्त्वाच्या सुधारणा करा. यामुळे रिटर्नमध्ये चुकीची माहिती जाण्याची शक्यता कमी होईल.
2. PAN-Aadhaar लिंक आणि बँक खातं तपासा तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे का, हे आधी तपासा. त्याचबरोबर आयकर विभागाच्या पोर्टलवर रिफंड मिळणारं बँक खातं प्री- व्हॅलिडेट आणि नॉमिनेट करा. कंपन्या आणि बऱ्याच ऑडिट प्रकरणांमध्ये वैध डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (DSC) तयार ठेवणंही महत्त्वाचं आहे.
3. AIS, TIS आणि Form 26AS मधील माहिती जुळवा आयटीआर दाखल करण्याआधी AIS, TIS आणि Form 26AS मधले उत्पन्न, व्याज आणि TDS ची माहिती तपासा. चुकीची किंवा डुप्लिकेट नोंद आढळल्यावर त्यावर फीडबॅक द्या. तसेच ई-कॅम्पेनचे अलर्ट तपासून महत्त्वाच्या कागदपत्रांसोबत उत्तर द्या. ITR उशिरा भरल्यास दंड किती? आयटीआर दाखल केल्यावर ३० दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. मुदतीत व्हेरिफिकेशन न केल्यावर रिटर्न उशिरा दाखल झाल्याचं मानलं जाऊ शकतं. मुदर चुकल्यावर कलम 234F अंतर्गत लेट फी आणि कलम 234A अंतर्गत दरमहिन्याला १ टक्के व्याज लागू होऊ शकतं. असेसमेंट इयर 2026-27 साठी बिलेटेड रिटर्नची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२६ आहे.