MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठी दिवाळी भेट ! तब्बल ''इतक्या'' हजार पदांसाठी भरती
MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठी दिवाळी भेट ! तब्बल ''इतक्या'' हजार पदांसाठी भरती
img
Nandini khandare More

दिवाळीच्या मुहूर्तावर MPSC च्या माध्यमातून सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत भरती होणाऱ्या पदांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. आधी जाहीर केलेल्या पदांमध्ये वाढ करून आता एकूण 16 हजार 717 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात नवीन पत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यातील सरकारी भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर विविध विभागांकडून मिळालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोणत्या पदांसाठी किती जागा? 
आयोगाच्या माहितीनुसार, राज्यातील 25 प्रशासकीय विभागांमध्ये एकूण 16,717 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये लिपिक-टंकलेखक पदांसाठी सर्वाधिक 3,966 जागा आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागात 3,911 पदे भरली जाणार आहेत. तर महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदांसाठी आता 1,840 जागा उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीमध्ये विविध पदांसाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार जागांचा तपशीलही देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना आपल्या प्रवर्गानुसार उपलब्ध जागांची माहिती मिळवता येणार आह.

अर्ज करण्यासाठी पुन्हा संधी या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आणखी एक महत्त्वाचा दिलासा मिळाला आहे. शासनाने कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढीव जागांमुळे उमेदवारांना नव्याने अर्ज किंवा पदांचे विकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

असा करा ऑनलाइन अर्ज इच्छुक उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर ONLINE FACILITIES मधील Online Application System हा पर्याय निवडावा. नवीन उमेदवारांनी New User Registration करून नोंदणी करावी. आधीच नोंदणी केलेल्या उमेदवारांनी लॉगिन करावे. त्यानंतर Online Application मध्ये जाऊन महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 निवडावी आणि आवश्यक माहिती भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.
इतर बातम्या
Join Whatsapp Group