‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील पहिलं गाणं समोर; ‘तुमच्या प्रेमाचा टेबल टाका’ची चर्चा!
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील पहिलं गाणं समोर; ‘तुमच्या प्रेमाचा टेबल टाका’ची चर्चा!
img
Nandini khandare More
सध्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा 20 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे राज्यातील उच्चस्तरीय राजकीय व सामाजिक वर्तुळातील अनेक गुपिते बाहेर आणणार असल्याचा दावा केला जात आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर अनेक अडचणी आल्या होत्या. पण आता अखेर या चित्रपटाला हिरवा सिग्नल मिळाला आहे.नुकताच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ या आगामी चित्रपटातील कलाकारांचे फेस रिवील नुकतेच समोर आले आहेत. आता या चित्रपटातील पहिले गाणेही रिलीज झाले असून ते पॅनोरामा म्युझिक मराठी या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. मुग्धा कऱ्हाडे यांनी गायलेले ‘कॅप्टन तुम्ही मी नौका’ हे गाणे सध्या खास चर्चेत आहे. गाण्याचे संगीत रोहित नागभिडे यांनी दिले असून गीतलेखन संजय नावगिरी यांचे आहे. गाण्याचे भावपूर्ण बोल आणि संपूर्ण सादरीकरण पाहून प्रेक्षक या चित्रपटाबाबत उत्सुकता दाखवत आहेत. सध्या या गाण्यावर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
कोणते कलाकार दिसणार?

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात भोंदूबाबाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी दिसत आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री दिपाली सय्यद, अभिनेता सुबोध भावे, माधुरी पवार हे कलाकार देखील दिसणार आहेत. सध्या चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group