सध्या सोशल मीडियावर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. दोघांच्या नात्याबाबतच्या अफवा, व्हायरल पोस्ट आणि ऑनलाइन कमेंट्समुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. आता या कथित ऑनलाइन छळाविरोधात सायबर क्राईमकडे धाव घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.
रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा काही काळापूर्वी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ९' या शोमध्ये सहभागी झाले होते. तिथे त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या पण त्यानंतर त्यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग व्हायला सुरुवात झाली. आता या कलाकारांनी सोशल मिडियावर त्यांच्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. या दोन्ही कलाकारांच्या टीमने चुकीची माहिती पसरवणे आणि ऑनलाइन छळ केल्याप्रकरणी हैदराबाद सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या ट्रोलिंगसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
रश्मिका आणि विजयच्या टीमची सायबर क्राईम विभागाकडे तक्रार मिळालेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या टीमने सायबर क्राईम अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीसोबत तपासासाठी आवश्यक असलेल्या काही सोशल मीडिया पोस्ट, ऑनलाइन आर्टिक्लस, मिम्स आणि लिंक्सही जोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची कायद्यानुसार चौकशी करण्याची मागणी टीमने केली आहे. कलाकारा टीमने या दोन्ही कलाकारांना टार्गेट करून जाणीवपूर्वक छळ केल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांबाबत अद्याप तपासातून काय निष्पन्न झाले नाही.
‘कॉफी विथ करण ९’मध्ये नेमकं काय घडलं? करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ९’ या शोमध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल खुलासा केला. शोदरम्यान रश्मिकाने सांगितले की, तिने विजयला लग्नाबद्दल विचारले होते आणि जवळपास वर्षभर तिने त्याला लग्नासाठी विचारले. कारण, विजयने तिला लग्नासाठी तब्बल १०० वेळा विचार असे सांगितले होते. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काही नेटकऱ्यांनी विजयच्या प्रतिक्रियेवर टीका करत त्याला ‘रेड फ्लॅग’ म्हटले, तर काहींनी रश्मिकाची बाजू घेतली. वाढत्या ट्रोलिंगनंतर रश्मिकाने स्पष्ट केले की, त्यांच्यासाठी लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे होते. त्यानंतर दोघांच्या टीमने बनावट मजकूर, स्क्रीनशॉट्स आणि ऑनलाइन छळाबाबत हैदराबाद सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली.