आधी बंधक बनवलं, मग ५० लाखांवर डल्ला ! भाजप नेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार
आधी बंधक बनवलं, मग ५० लाखांवर डल्ला ! भाजप नेत्यासोबत घडला धक्कादायक प्रकार
img
Nandini khandare More
भाजप नेत्या यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी थेट त्यांच्या घरात प्रवेश करत त्यांचे हात-पाय बांधले आणि त्यांना घरातच बंधक बनवले. त्यानंतर चोरट्यांनी घरातील तब्बल ५० लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

भाजप नेत्यालाच त्यांच्याच फार्महाऊसवर बंधक बनवून चोरठ्यांनी ५० लाख रूपयांची लूट केली. ही धक्कादायक घटना कानपूरमध्ये घडली. येथील वरिष्ठ नेते रमेश यादव यांना प्रमोशन मिळाले होते. त्यांना दिवसभर अभिनंदन आणि शुभेच्छांचे मेसेज येत होते. पण रात्री फार्महाऊसवर त्यांनाच चोरट्यांनी बंधक बनवून ५० लाखांची लूट केली. घटनेनंतर कानपूर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. यादव यांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभिनंदनाचे मेसेज येत होते. पण मध्यरात्रीत त्यांच्याकडील लाखो रुपयांची लूट झाली. रमेश यादव यांची भाजपच्या मागासवर्गीय आघाडीतर्फे नवनियुक्त राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. ही जबाबदारी स्वीकारून लखनौहून परतल्यानंतर मध्यरात्री अज्ञात लोक फार्महाऊसमध्ये घुसले. यादव यांचे हातपाय बांधले आणि त्यांना ओलीस ठेवले. त्यांच्याकडून ५० लाख रुपये लुटण्यात आले. या घटनेनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रमेश यादव यांचे फार्महाऊस शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर होते.

१ ऑक्टोबर हा दिवस कानपूरचे भाजप नेते रमेश यादव यांच्याकाठी अत्यंत खास होता. नुकतीच त्यांची भाजपच्या मागासवर्गीय आघाडीतर्फे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी सोमवारीच लखनौमध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला होता आणि सायंकाळी उशिरा ते कानपूरला परतले. दिवसभराच्या धावपळीनंतर ते शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या फार्महाऊसवर विश्रांती घेत होते. मात्र, मध्यरात्री घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group