​येवला-नांदगाव महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू
​येवला-नांदगाव महामार्गावर बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

​येवला (भ्रमर वार्ताहर) :- येवला-नांदगाव राज्य महामार्गावरील राजापूर परिसर येथे आज सकाळी एका भीषण अपघाताने येवला तालुका हादरून गेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास, नांदगावहून येवल्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका लक्झरी बसची आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर बसमधील ७ प्रवासी जखमी झाले आहेत.


​घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत तालुका पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.​सकाळच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे येवला-नांदगाव मार्गावर काही वेळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group