Nashik : जॉगिंग ट्रॅकवर पोलीस अधिकार्‍यांनी साधला नागरिकांशी संवाद
Nashik : जॉगिंग ट्रॅकवर पोलीस अधिकार्‍यांनी साधला नागरिकांशी संवाद
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नागरिकांच्या दैनंदिन समस्या, अडचणी, सूचना, तसेच त्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबी प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शनिवारी जॉगिंग ट्रॅकवर ‘वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा नागरिकांशी संवाद’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी शहरातील विविध ठिकाणच्या जॉगिंग ट्रॅकवर जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या सूचना, समस्या व अभिप्राय जाणून घेतले.


यावेळी नागरिकांनी परिसरातील वाहतूक समस्या, सार्वजनिक ठिकाणची सुरक्षितता, विविध स्थानिक समस्या आदी मुद्यांवर पोलीस व अधिकार्‍यांना सूचना केल्या. त्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आले.

यावेळी पोलिसांनी नागरिकांना आपद्कालीन मदतीसाठी 112, महिला सुरक्षा हेल्पलाईन 1091, बालकांसाठी हेल्पलाईन 1098 हे फोन क्रमांक, तसेच सायबर गुन्हे व ऑनलाईन आर्थिक फसवणुकीसाठी तक्रार करावयाची असल्यास 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
या उपक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे व सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचा सहभाग होता.

नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाऊन घेऊन त्यांचे निराकरण केले जाईल, तसेच या उपक्रमाने नागरिक व पोलीस यांच्यात विश्‍वासाचे नाते अधिक दृढ होणार आहे. या उद्देशाने असा उपक्रम यापुढेही चालविण्यात येईल. 

इतर बातम्या
Nashik : FDA ची

Join Whatsapp Group