मोठी बातमी ! कॅबिनेट बैठकीत डिलिमिटेशन विधेयक मंजूर
मोठी बातमी ! कॅबिनेट बैठकीत डिलिमिटेशन विधेयक मंजूर
img
Nandini khandare More
देशाच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाबाबत केंद्र सरकारकडून मोठी घडामोड घडल्याची चर्चा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेल्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आता हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मांडले जाणार आहे. जर हे विधेयक मंजूर झालं तर प्रत्येक राज्याच्या 50 % जागा वाढणार आहेत. तसेच लोकसभेच्या जागा 543 वरून 815 होणार आहेत.

डिलिमिटेशन विधेयकाला कॅबिनेट बैठकीत मंजूरी मिळाल्यानंतर सर्वांच्या नजरा हिवाळी अधिवेशनाकडे लागल्या आहेत. ३० नोव्हेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये डिलिमिटेशन विधेयक सादर केलं जाण्याची शक्यता आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंनारी शक्ती वंदन कायद्याशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकालाही मंजुरी दिली. यामध्ये सर्व राज्यांमध्ये समान प्रमाणात ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. ५० टक्के जागा वाढल्यास ही संख्या ७२ पर्यंत पोहोचू शकते. सर्व राज्यातील जागांच्या संख्येवरील ही मर्यादा २०५१ पर्यंत लागू राहणार आहे..

नेमक्या तरतुदी काय आहेत? ३० नोव्हेंबर रोजी लोकसभेचे आणि २ डिसेंबर रोजी राज्यसभेचे अधिवेशन सुरू होणार असून, या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विधेयकात जागांमध्ये ५० टक्के वाढीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेच्या जागांची संख्या ८५० होईल. त्यामध्ये राज्यांमध्ये ८१५ आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ३५ जागा असतील. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला लोकसभेत दोन-तृतीयांश पाठिंब्याची आवश्यकता आहे. रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक या दोन्हीसाठी आवश्यक संख्याबळ मिळवले आहे.

संख्याबळाचं नेमकं गणित काय आहे?

 डिलिमिटेशन विधेयकावर मतदान करण्यासाठी सभागृहात दोन-तृतीयांश बहुमताची गरज आहे. लोकसभेत सध्या ५४३ जागा आहेत. त्यापैकी ३ जागा रिक्त आहेत. म्हणजे सध्या ५४० खासदार आहेत. ५४० च्या दोन-तृतीयांश म्हणजे ३६० खासदारांचा पाठिंबा या विधेयकाला मंजूर कऱण्यासाठी लागतील. सध्या भाजप प्रणित एनडीएकडे ३२० खासदार आहेत. भाजपा-241 एनसीपीआय-20 टीडीपी-16 शिवसेना-13 जेडीयू-12 इतर-18
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group