सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दरांमध्ये सुरू असलेल्या चढ-उतारानंतर आता भाव कमी झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट ठरणार आहे. पण आज २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा नेमका भाव किती? चांदीचे दर कितीने घसरले? जाणून घ्या सविस्तर...
आज दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगावच्या सराफा बाजारात पुन्हा सोन्याचा भाव ३५०० रुपयांनी, तर चांदीचा भाव तब्बल ८००० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणं सर्वसामान्यांसाठी सोपं झालं आहे.
आज सराफा बाजारातील सोन्याच्या भाव १,२३,००० रुपये आहे. यामध्ये ३५०० रुपयांनी घसरण झाली आहे. तर चांदीचा आजचा भाव १,४९,००० रुपये आहे. यामध्ये तब्बल ८,००० रुपयांनी घसरण झालेली आहे. ही घसरण आणखी वाढत राहील की कमी होईल याकडे सर्व ग्राहकांचं लक्ष लागलं आहे. दिवाळीच्या दिवसांमध्येही सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. तेव्हा नागरिकांनी सोनं-चांदी खरेदी करणं पसतं केलं.
तसेच GoodReturn नुसार, मुंबई- पुण्यात आज २४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव १२, ४५८ रुपये आहे. २२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ११,४२० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९,३४४ रुपये इतके आहे. तर १ ग्रॅम चांदी १६५ रुपये असून १ किलो चांदीचा भाव १,६५,००० रुपये इतका आहे.
पुढे आपण २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमती पाहणार आहोत. २४ कॅरेट १ तोळा सोनं - १,२४,५८० २२ कॅरेट १ तोळा सोनं - १,१४,२०० १८ कॅरेट १ तोळा सोनं - ९३,४४० सध्या ग्राहक सोनं-चांदीच्या किंमतीत आणखी घसरण होण्याची वाट पाहतायेत. गेल्या काही दिवसांची घसरण पाहता ग्राहक सोनं-चांदी खरेदी करणं पसंत करतायेत. पुढे आणखी घसरण होईल अशी शक्यता आहे.