५२ चेंडूंत द्विशतक, २८ षटकार ! वैभव सूर्यवंशीचा मैदानात धुमाकूळ; क्रिकेटविश्व थक्क
५२ चेंडूंत द्विशतक, २८ षटकार ! वैभव सूर्यवंशीचा मैदानात धुमाकूळ; क्रिकेटविश्व थक्क
img
Nandini khandare More

वय लहान, पण कामगिरी विश्वविक्रमी! वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. Rising Stars Asia Cup मध्ये UAE च्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने अवघ्या ५२ चेंडूंमध्ये द्विशतक झळकावले. २८ षटकार आणि ७ चौकारांसह त्याने २०४ धावांची खेळी केली. त्याच्या या कामगिरीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

रायझिंग स्टार पुरुष आशिया चषक  क्रिकेट स्पर्धेत आज (मंगळवार दि. २४ नोव्हेंबर) रोजी भारतीय संघाचा  सामना संयुक्त अरब अमिराती (यूएई) सोबत पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिरातीने भारतासमोर २४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने जोरदार फटकेबाजी त्याचे क्रिकेट इतिहासातील पहिले द्विशतक पूर्ण केले. त्याने ५२ चेंडूत २०४ धावा केल्या. यानंतर भारताने १४.२ षटकांत २५४ धावा पूर्ण करत संयुक्त अरब अमिरातीवर ७ गडी राखून विजय मिळविला. कॅलेंडर पहा

वैभव सूर्यवंशीने सुरुवातीला १६ धावांमध्ये अर्धशतक पूर्ण केले. तर अभिषेक शर्मा १२ आणि प्रभसिमरन सिंह ३ धावा करुन बाद झाले. मात्र, रिंकु सिंगने एक बाजू सांभाळून धरत दुसऱ्या बाजूने वैभव सूर्यवंशीने तुफानी फलंदाजी करत यूएईच्या गोलदाजांची चांगलीच धुलाई केली. वैभवच्या वादळी फलंदाजीमुळे भारताने पाच षटकांत १०० धावांचा टप्पा गाठला होता. तर २८ चेंडूत १०३ धावा करत त्याने शतक पूर्ण केले. त्यानंतर तो २०४ धावा करून बाद झाला. तर रिंकू सिंगने २७ धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान, यूएईने भारताविरोधात फलंदाजी करताना २४९ धावा केल्या होत्या. त्यांच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या षटकात त्यांनी आर्याशंची विकेट गमावली. तर सहाव्या षटकात शाहदाद ४६ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. याशिवाय एथन डिसूजाने ३७ चेंडूत २५ धावा केल्या. तसेच हरप्रीत सिंह भाटियाने १४४ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १३० धावा केल्या. यामुळे यूएईचा संघ २४९ धावांपर्यंत पोहोचू शकला. भारताकडून अरशद खानने ४ गडी बाद केले.

भारतानं आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत पहिल्या सामन्यात नेपाळवर मोठा विजय मिळवला होता. तर, पाकिस्तान विरोधातील सामन्यात भारताचा ४८ धावांनी पराभव झाला होता. यूएईला नेपाळनं ६ गडी राखून पराभूत केले होते. त्यानंतर आता भारताने यूएईचा पराभव केल्याने ४ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे.

इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group