मोठी बातमी !  देशातील सर्वात मोठ्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी; तारखांबाबत मोठी अपडेट समोर!
मोठी बातमी ! देशातील सर्वात मोठ्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी; तारखांबाबत मोठी अपडेट समोर!
img
Nandini khandare More

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तयारी आता वेगाने सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात आतापासूनच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. देशातील सर्वात मोठ्या राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल नेमका कधी वाजणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा कधी होणार, निवडणूक आयोगाचा संभाव्य कार्यक्रम काय असू शकतो आणि सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तयारीला कधी वेग येणार? याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे यूपीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये २०२७ च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत. या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील. मात्र, निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची अधिकृत घोषणा यंदा थोडी उशिरा होऊ शकते. ही घोषणा १५ जानेवारी २०२७ च्या आसपास होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ राज्यांमध्ये मतदानाला २२ फेब्रुवारीनंतर सुरुवात होऊ शकते. यामध्ये उत्तर प्रदेशातील निवडणूक ३ ते ४ टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. तर पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये एकाच टप्प्यात मतदान घेण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मात्र, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांमधील अधिकाऱ्यांचे दौरे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. हे दौरे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त संबंधित राज्यांचा दौरा करणार आहेत. या प्रक्रियेला जवळपास महिनाभर लागू शकतो. सर्व राज्यांचा आढावा घेतल्यानंतरच निवडणुकीची घोषणा केली जाईल.

यंदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवताना आयोगासमोर काही महत्त्वाची आव्हाने आहेत. उत्तर प्रदेशातील बोर्डाच्या परीक्षा आणि प्रयागराजमधील माघ मेळ्याचा विचार करून मतदानाच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. यूपी बोर्डाच्या परीक्षा ५ ते २४ फेब्रुवारीदरम्यान होण्याची शक्यता आहे. तर माघ मेळा १४ जानेवारी ते ९ मार्चपर्यंत चालणार आहे. या काळात लाखो भाविक प्रयागराजमध्ये येतात. त्यामुळे निवडणूक आणि परीक्षा यांचा एकमेकांवर परिणाम होणार नाही, याची काळजी आयोगाला घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ १३ मार्च २०२७ रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याआधी सर्व पाच राज्यांतील निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे २४ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाच राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ कधी संपणार? मणिपूर – १३ मार्च २०२७ गोवा – १४ मार्च २०२७ पंजाब – १६ मार्च २०२७ उत्तराखंड – २८ मार्च २०२७ उत्तर प्रदेश – २२ मे २०२७ मात्र, निवडणुकीच्या अधिकृत तारखा जाहीर झाल्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group