पेपरफुटी करणाऱ्यांची खैर नाही! पेपरफुटी प्रकरणात कठोर शिक्षा, थेट १० कोटींचा दंड अन...
पेपरफुटी करणाऱ्यांची खैर नाही! पेपरफुटी प्रकरणात कठोर शिक्षा, थेट १० कोटींचा दंड अन...
img
Nandini khandare More
पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार आहेत. पेपरफुटी करणारे, परीक्षेतील गैरप्रकारांना मदत करणारे आणि यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर मोठी कारवाई होऊ शकते. दोषींना तब्बल १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहिती समोर आली आहे. नेमका हा नियम कोणासाठी लागू होणार आणि कोणत्या परीक्षांचा यात समावेश आहे? जाणून घेऊया.

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० कोटींचा दंड ठोठावला जाणार आहे. त्याचसोबत त्याला १० वर्षांपर्यंत कारावासाच्या शिक्षेची शिफारस करण्यात आली आहे. भरती आणि स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने दुसरा अहवाल सादर केला. या अहवालामध्ये पेपरफुटी आणि संघटित गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची शिफारस करण्यात आली आहे.

संघटित गुन्हेगारीत सहभागी व्यक्ती आणि संस्थांना ७ ते १० वर्षांच्या कारावासाची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुचवली आहे. अनुचित साधनांचा वापर करणाऱ्यांना ५ ते १० वर्षे कारावास आणि ५० लाखांपर्यंत दंड ठोठवला जावा अशी तरतूद करण्यात आली. गैरप्रकारात सहभागी सेवा पुरवठादार संस्थांना ५ कोटींपर्यंत दंड आणि ८ वर्षांसाठी बंदी असणार आहे. परीक्षा गैरप्रकारांचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची शिफारस करण्यात आली.

गंभीर प्रकरणांच्या तपासासाठी विशेष कृती दल (STF) स्थापन करण्याची सूचना द्यावी. परीक्षा गैरप्रकारांचे खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयांची शिफारस करण्यात आली आहे. हा निर्णय झाल्यास एमपीएससी परीक्षार्थिंना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याची देखील शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे. उत्तरतालिकेवरील उमेदवाराची हरकत योग्य ठरल्यास हरकतीसाठी भरलेले शुल्कही परत मिळणार आहे. दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

उमेदवारांसाठी आधार किंवा MahaID द्वारे एकदाच नोंदणीची सुविधा देण्यात येईल. परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेत मोठे प्रशासकीय बदल सुचवण्यात आलेत. रिक्त पदांची माहिती वेळेत मिळण्यासाठी Integrated Requisition Portal विकसित करण्याची शिफारस करण्यात आली. सप्टेंबरअखेरपर्यंत विभागांनी भरतीचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवावे असे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करण्याची सूचना देण्यात आली.

परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांच्या निवडी आणि व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याची सूचना करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेसाठी स्वतंत्र तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा कक्ष स्थापन करण्याची शिफारस केली. राज्यातील भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असेल. राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ४ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल. समितीचा दुसरा अहवाल २३ नोव्हेंबर २०२६ रोजी शासनाला सादर केला गेला. या शिफारशींच्या अंमलबजावणीनंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत.
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group