पुढील काही तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत! चक्रीवादळाच्या संभाव्य हालचालींमुळे अनेक भागांत सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या वादळी प्रणालीचा प्रवास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे? कोणत्या भागांत पावसाचा जोर वाढू शकतो? जाणून घेऊया...
अमेरिकेतील नागरिकांसाठी पुढचे 12 तास केवळ धोक्याचेच नाही तर जीवेघेणे ठरणारे आहेत. या 12 तासात मोठं संकट येणार आहे. प्रचंड वादळ धडकणार असून अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे रस्ते आणि हायवे पाण्याखाली जाणार आहे. हजारो घरे आणि दुकानेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार आहेत. प्रचंड वेगाने वादळ येत असल्याने हवेबरोबर विजेचे खांब आणि घरांची छतही उडून जाणार आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे वर्षभर हे नुकसान होत राहणार आहे. 2027 पर्यंत हे संकट नागरिकांच्या डोक्यावर घोंघावत राहणार आहे. येत्या 12 तासात वेगाने परिस्थिती बदलणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी दिली आहे.
पुन्हा एकदा चक्रीवादळाचे संकट घोंगावत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. वादळी प्रणालीच्या हालचालींमुळे हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील काही तास महत्त्वाचे मानले जात असून, काही भागांत जोरदार वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
अमेरिका आणि कॅनडाच्या किनारपट्टीवर हा सर्वात मोठा हाहा:कार उडणार आहे. या 12 तासात मोठं संकट येणार आहे. प्रचंड वादळ धडकणार असून अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे रस्ते आणि हायवे पाण्याखाली जाणार आहे. हजारो घरे आणि दुकानेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार आहेत. प्रचंड वेगाने वादळ येत असल्याने हवेबरोबर विजेचे खांब आणि घरांची छतही उडून जाणार आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे वर्षभर हे नुकसान होत राहणार आहे. 2027 पर्यंत हे संकट नागरिकांच्या डोक्यावर घोंघावत राहणार आहे. येत्या 12 तासात वेगाने परिस्थिती बदलणार आहे, अशी माहिती हवामान खात्यातील शास्त्रज्ञांनी दिली आहे.
अमेरिका आणि कॅनडाच्या किनारपट्टीवर हा सर्वात मोठा हाहा:कार उडणार आहे. या ठिकाणी हवामानात अचानक बदल होणार आहे. एक ट्रॉपिकल हवा आणि वादळी पाऊस उत्तर पूर्वेकडे सरकणार आहे. याचाा थेट परिणाम न्यू इंग्लंडच्या उत्तर पूर्वेला दिसणार आहे. कॅनडाच्या नोव्हा स्कोटियामध्येही याचा थेट परिणाम होताना दिसणार आहे.
ही सिस्टिम न्यूफाउंडलँड बेटाच्या दिशेने सरकरणार आहे. हे वादळ आक्राळविक्राळ रुप घ्यायला थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. त्यामुले मिड अटलांटिक किनारपट्टीच्या भागाचं होणारं मोठं नुकसान टळणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ही सिस्टिम आपला वेग वाढवत न्यू इंग्लंड आणि नंतर नोवा स्कोटिया तसेच न्यूफाउंडलँडच्या दिशेने जाईल. त्यावेळी जोरदार पाऊस होणार असून वादळीवारे सुटणार आहेत.
वादळाला नाव का नाही?
हवामानाच्या सिस्टिममध्ये एकाचवेळी अनेक लो प्रेशर सेंटर बनले होते. त्यामुळे अंतर्गत ओढताणीमुळे अत्यंत शक्तीशाली ट्रॉपिकल डिप्रेशन बनलं नाही किंवा त्याचं रुपांतर मोठ्या वादळात झालं नाही. जेव्हा ट्रॉपिकल स्टॉर्मच्या कॅटेगिरीत सिस्टिम जाते, तेव्हाच वादळाला नाव दिलं जातं. त्यामुळेच या वादळाला अद्याप नाव दिलं गेलं नाही. या ओढताणीमुळे मिड अटलांटिक परिसरात होणारं मोठं नुकसान टळलं आहे. परंतु 22 नोव्हेंबरच्या रात्री न्यू इंग्लंडच्या अनेक भागात वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे.
रस्ते पाण्याखाली, समुद्र खवळला
हे वादळ छोट्या नॉर इस्टर सारखं वाटत असलं तरी आत अजून बरीच ट्रॉपिकल दमटपणा अजून आहे. याचा थेट अर्थ काही परिसरात अचानक वेगाने पाऊस होऊ शकतो. त्यामुळे रस्ते आणि हायवे पाण्याखाली जाणार आहेत. फ्लॅश फ्लडिंगची समस्या निर्माण होऊ शकते.
किनारपट्टीच्या परिसरात वेगाने वारे वाहत असून समुद्रही खवळलेला दिसत आहे. समुद्रात उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.