मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक क्षण ! १०० व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड
मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक क्षण ! १०० व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड
img
Nandini khandare More
मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना मिळाला आहे. पुण्यात होणाऱ्या या शतकमहोत्सवी संमेलनाकडे आता संपूर्ण साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.मराठी साहित्य संमेलनाच्या शतकमहोत्सवी वर्षात त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 'अक्करमाशी' हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र देशभरात प्रसिद्ध आहे

पुण्यात होणाऱ्या या ऐतिहासिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसांपासून अनेक ज्येष्ठ साहित्यिकांची नावे चर्चेत होती. यामध्ये डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्यासह रमेश पतंगे, विजय कुवळेकर आणि बाबा भांड आदि साहित्यिकांची नाव चर्चेत होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत अध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला. डॉ. लिंबाळे यांच्या नावाला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा पाठिंबा दिल्यामुळे त्यांची शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यत आली.

कोण आहेत डॉ. शरणकुमार लिंबाळे? 

डॉ. शरणकुमार लिंबाळे हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, कादंबरीकार, समीक्षक आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म १ जून १९५६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर येथे त्यांचा जन्म झाला. दलित साहित्याच्या क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक विषमता, जातिव्यवस्था, संघर्ष, अन्याय आणि मानवी मूल्यांचे प्रभावी चित्रण पाहायला मिळते. त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनातून जातिव्यवस्था, सामाजिक विषमता, उपेक्षितांचे जगणे आणि संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण समोर आले. या आत्मकथेमुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली. त्यांच्या लेखनाला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील साहित्यविश्वात मोलाचे स्थान आहे. डॉ. लिंबाळे यांनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ साहित्य क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यांच्या नावावर ‘सनातन’, ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘दलित ब्राह्मण’ यांसारखी ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र', 'दलित साहित्य आणि सौंदर्य' यांसारख्या पुस्तकांमधून त्यांनी दलित साहित्याचा वैचारिक आणि समीक्षात्मक दृष्टिकोन मांडला आहे.त्यांनी मराठी विषयातून पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक तसेच संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.

पुण्यात रंगणार शतकमहोत्सवी साहित्य संमेलन दरम्यान, शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून संमेलनाचे आयोजन केले जाणार आहे. या संमेलनात देशभरातील साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत आणि साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन विशेष आकर्षणाचे ठरणार आहे. 
इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group