जळगावच्या सहा जणांना गुजारतच्या कालव्यात फेकल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण ! हत्येचं कारण समोर
जळगावच्या सहा जणांना गुजारतच्या कालव्यात फेकल्याच्या प्रकरणाला धक्कादायक वळण ! हत्येचं कारण समोर
img
Nandini khandare More
गुजरातमधील सहा जणांना कालव्यात फेकल्याच्या धक्कादायक प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. अंधारात गाडी अडवून संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याच्या या घटनेमागचं कारण अखेर तपासातून समोर येत असल्याची माहिती आहे. आर्थिक व्यवहार आणि विम्याच्या रकमेचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

कामाच्या शोधात निघालेलं एक कुटुंब रस्त्यात मृत्यूच्या जाळ्यात अडकलं. दुसऱ्या कारनं आलेल्या चार जणांनी कुटुंबाची कार अडवली आणि कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीनं खाली उतरवून एक-एक करून खोल कालव्यात फेकलं. या घटनेतील पाच जणांचे मृतदेह हाती लागले असून पाचही जणांची हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित एक मुलगा हा बचावाला असून तो सुखरुप आहे, त्याच्यामुळे घटना उघड झाली आहे.

नितीन पाटील , कविता पाटील, श्रुती पाटील वय 9 वर्ष , प्रथमेश पाटील वय 3 वर्ष आणि हरीश पाटील वय 15 वर्षे अशी मयत कुटूबियांची नावे आहेत. याप्रकरणी एकच कुटुंबातील पाचही जणांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून बारडोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक केली आहे. जळगावच्या मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल 50 लाखांच्या विमा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याशी या गुजरात येथील हत्याकांडाचे धागेदोरे असल्याचे समोर आले आहे.

अपघाताचा बनाव करून 50 लाखाचा विमा हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून सात जण अटकेत असून कारागृहात आहेत. मयत नितीन आणि कविता हे दोन्ही मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयित आरोपी असून याच अनुषंगाने त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विमा कंपन्यांशी फसवणूक करून मिळालेली 10 लाखांची रक्कम मयत कविता हिच्याकडे होती, त्यातून हत्याकांड झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गुजरात येथील हत्याकांडाच्या घटनेत मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सात आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्याकांडातील आरोपींची संख्या एकूण 8 झाली आहे, अद्यापही तीन आरोपी फरार आहेत.
advertisement

अपघाताचा बनाव करून विमा कंपन्यांची फसवणूक
गुजरात हत्याकांडाच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये एक डॉक्टर, 4 पोलिस , विमा एजंट आणि इतरांचा समावेश आहे. चांगलं काम मिळवून देतो असे सांगून आरोपींनी जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये बोलावून त्यांची हत्या केल्याची माहिती तपासात समोर आळी आहे. जळगावच्या मजूर कुटुंबाला गुजरात येथे कालव्यात फेकून दिल्याच्या घटनेला नवी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांच्या तपासात घटनेतील आरोपींच्या टोळीने अनेक घटनांमध्ये अपघाताचा बनाव करून विमा कंपन्यांची फसवणूक केल्याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये जळगावच्या हत्याकांडाच्या घटनेबाबत जळगाव पोलिस सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत माहिती देणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group