पहाटेच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याचा अनुभव आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. भूकंप आल्याची भीती निर्माण झाल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. अचानक जाणवलेल्या या हादऱ्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मात्र, जमिनी हादरण्यामागचे नेमके कारण काय होते? जाणून घेऊया सविस्तर...
आलेल्या माहितीनुसार , नंदुरबारमध्ये पहाटे अचानक भूकंपासारखे हादरे बसले. त्यामुळे झापेत असलेले नागरिक जागे झाले आणि घाबरून त्यांनी थेट घराबाहेर धाव घेतली. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात पहाटे जमीन हादरली. घरातील वस्तू देखील खाली पडल्या. त्यानंतर शहरामध्ये भूकंप आला भूकंप आला अशी चर्चा होऊ लागली. शहरात भूकंप झाल्याच्या अफवेने घबराट पसरली. भूकंप झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली. पण नंतर काळले की तो भूकंप नव्हता तर मुरूम उत्खननाच्या नावाखाली डोंगरात घडवले भयंकर स्फोट होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसर अचानक हादरल्याने नागरिकांमध्ये भूकंपाची भीती पसरली. घरातील खुर्च्या खाली पडल्याने सोशल मीडियावर भूकंपाच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, या थरकापामागचं धक्कादायक सत्य समोर आलं. हा भूकंप नसून स्फोटके लावून अवैध ब्लास्टिंगचा प्रकार असल्याचं उघड झालं आहे