महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ ! सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित ?
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ ! सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित ?
img
Nandini khandare More
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेस संघटनेत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. नेमक्या कोणत्या नियुक्त्या स्थगित करण्यात आल्या आहेत? पक्षाने हा निर्णय का घेतला? जाणून घेऊया सविस्तर...

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला असून, प्रदेशातील विविध पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून असलेली जबाबदारी तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून महत्त्वपूर्ण संघटनात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार, पुढील आदेश येईपर्यंत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील उपाध्यक्षांच्या झोनल इन्चार्ज प्रभारी, संघटन महासचिव प्रभारी, लीगल टीम, मीडिया टीम आणि सोशल मीडिया टीम, कोषाध्यक्ष तसेच प्रशासकीय महासचिव प्रभारी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हा प्रभारी आणि सहप्रभारी म्हणून असलेली जबाबदारी स्थगित करण्यात आली आहे.

सर्व पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा प्रभारीपदाच्या जबाबदाऱ्या स्थगित करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांचा या निर्णयात समावेश आहे. जिल्हा स्तरावरील संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रभारी आणि सहप्रभारी पदाधिकाऱ्यांना या निर्णयाचा थेट फटका बसणार आहे. प्रदेशातील संघटनात्मक रचना आणि जिल्हा स्तरावरील जबाबदाऱ्यांच्या संदर्भात हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.आता काँग्रेसमध्ये जिल्हास्तरीय जबाबदाऱ्यांची नव्याने आखणी होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर जिल्हा स्तरावरील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मात्र नव्या नियुक्त्यांबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही.s

मात्र, या जबाबदाऱ्या स्थगित करण्यामागील नेमके कारण किंवा पुढील संघटनात्मक बदलांबाबत आदेशात कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. पुढील आदेशापर्यंत निर्णय लागू असणार आहे. या आदेशात सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांनी निर्णयाचे पालन करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती कायम राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा, प्रदेशाध्यक्ष शिवराज बापूसाहेब मोरे, सहप्रभारी नवज्योतसिंग संधू आणि सहप्रभारी शांभवी शुक्ला यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
इतर बातम्या
Join Whatsapp Group