मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग! मराठा क्रांती मोर्चाची मोठी घोषणा; राज्यभर आंदोलनाचे संकेत ?
मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग! मराठा क्रांती मोर्चाची मोठी घोषणा; राज्यभर आंदोलनाचे संकेत ?
img
Nandini khandare More

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे सरकारसमोरील आव्हान वाढण्याची शक्यता आहे. आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जाणार असल्याची चर्चा आहे.  ‘प्रत्येक सरकारने मराठा समाजाला फसवलं आहे,मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय मिळत होता असे म्हणत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी तुळजापूरपासून संवाद यात्रा सुरू करणार आहे, अशी मोठी घोषणा केली आहे. हैद्राबाद गॅझेटवरुन मराठा बांधवांची फसवणूक केली जात आहे,’ असा मोठा आरोपही रमेश केरे पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले रमेश केरे पाटील?

“राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. ज्या 58 लाख नोंदी सापडल्यात त्या महाराष्ट्राच्या आहेत की मराठवाड्याच्या आहेत हे स्पष्ट करावे. मराठा समाजाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी असा इशारा दिला होता, मात्र अद्यापही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 5088 मुलांना नियुक्त्या देण्याचे काम केले. अण्णासाहेब महामंडळालाही भरीव निधी मिळत होता. ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठा समाजाला न्याय मिळत होता,’ असं रमेश केरे पाटील म्हणाले.

तसेच “प्रत्येक सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले. विखे पाटीलही आंदोलन उभे केलेही कोणता तरी जीआर दाखवून फसवणूक करतात. आम्ही ५डिसेंबरपासून तुळजापूरपासून संवादयात्रा काढणार आहे. हैद्राबाद गॅझेट नुसार आरक्षण देऊ, नाही दिले तर राजीनामा देईन असे प्रसाद लाड बोलले, दिला का राजीनामा,ठ असा सवालही मराठा क्रांती मोर्चा समन्वयांकडून उपस्थित केला.

‘शरद पवारांनी चूक केली…’

“काही लोक समाजाला बदनाम करत आहेत. एकनाथ शिंदे यांना खच्चीकरण करण्याचे काम समाजातील नेते करत आहेत. शरद पवार यांनी १९९४ साली चुक केली होती आणि मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. 1994 साली शरद पवार यांनी 167 जाती ओबीसीमध्ये टाकण्याचे काम केले होते. त्या फसव्या जीआरच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे. त्यावेळी शरद पवार यांनी हा जीआर काढला नसता तर आज ही वेळ आली नसती. जर या मुख्यमंत्र्यांनी जीआर रद्द केले तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल,” असंही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group