राजकारणात मोठी खळबळ ! काँग्रेसच्या ''या'' बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी
राजकारणात मोठी खळबळ ! काँग्रेसच्या ''या'' बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी
img
Nandini khandare More

राज्यातील राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. अशातच अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तलवार दाखवत ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष यासिन शेख यांना गावगुंडाने तलवार दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये घडली आहे. घटनेचा थरार सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. याप्रकरणी नवीन पालेगावातील गावगुंड सज्जन पाटील उर्फ बाबू याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेचा घटनाक्रम समोर आला आहे. अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील महाराज चहा या दुकानाबाहेर गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. यासिन शेख हे आपल्या मित्रासोबत दुकानात चहा पिण्यासाठी आले होते.

त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ गाडी दुकानाबाहेर लावली होती. याच वेळी गावगुंड सज्जन उर्फ बाबू पाटील हा त्याच्या फॉर्च्युनर गाडीतून तिथे आला आणि त्याने यासिन शेख यांच्याशी गाडी लावण्यावरून वाद घातला. यानंतर गाडीतून तलवार काढून तो शेख यांच्या अंगावर धावून आला. तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यासिन शेख याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी गावगुंड सज्जन उर्फ बाबू पाटीलला बेड्या ठोकल्या आहेत.

सज्जन उर्फ बाबू पाटीलने गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. त्याची पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास केला जाणार असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली आहे. तर आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांची या परिसरातील दहशत मोडीत काढण्याची मागणी काँग्रेस शहराध्यक्ष यासिन शेख यांनी केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group