काँग्रेसला मोठा धक्का ! बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
काँग्रेसला मोठा धक्का ! बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून भाजप मध्ये नेत्यांची इनकमिंग सुरु असून याचे मोठे हादरे महाविकास आघाडीला बसत आहेत. भाजपने आता काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. नंदुरबारच्या नवापूरमध्ये भाजपने मोठी खेळी करत काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांच्या निकटवर्तीयाला फोडले. काँग्रेसचे स्थानिक नेते आकाश गावित यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत अनेक सहकाऱ्यांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. यामुळे राजकीय वर्तुळात खळबल उडाली.

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला. काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांचे निकटवर्ती मानले जाणारे आकाश गावित यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. ​भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे नवापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली.

माजी खासदार कै. माणिकराव गावित यांचे नातू आणि नवापूर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांचे निकटवर्तीय आकाश गावित यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहल्याला जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी देखील उपस्थिती लावली. या पक्षप्रवेशामुळे नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढली. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवर याचा नेमका काय परिणाम होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group