नाशिकच्या ''या'' आस्थापनेवर FDAची धाड ! २५८ किलो मोतीचूर लाडू जप्त
नाशिकच्या ''या'' आस्थापनेवर FDAची धाड ! २५८ किलो मोतीचूर लाडू जप्त
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- वडनेर दुमाला येथील वडनेर गेट, शिवछत्रपती पुतळ्याजवळ असलेल्या ‘बालाजी लाडू’ या आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घालून 64 हजार 500 रुपये किमतीचे 258 किलो मोतीचूर लाडू जप्त केले आहेत, तसेच या संस्थेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

‘बालाजी लाडू’मध्ये तयार मालाची साठवणूक अस्वच्छ परिस्थितीत केली जात होती, तसेच मोतीचूर लाडू निकृष्ट दर्जाचे आढळले आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात अन्नरंगांचा वापर होत असल्याचे धाडीदरम्यान दिसून आले. त्यामुळे नाशिकचे सहआयुक्त मंगेश माने, सहाय्यक आयुक्त ज्ञानेश्‍वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी वैभव गर्दे व श्रद्धा राहिंज यांनी ही कारवाई केली

लाडूनिर्मिती करताना आढळलेल्या त्रुटी आणि अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याने अन्न व औषध प्रशासनामार्फत बालाजी लाडूचे नोंदणी प्रमाणपत्र तत्काळ निलंबित करण्यात आले आहे, अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे पालन करून, तसेच आवश्यक परवानगी घेऊनच अन्न व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group