​लग्न मंडपात राडा; लव्ह मॅरेज केलेल्या जोडप्याच्या लग्नात पेट्रोल-डिझेल फेकून पेटवण्याचा प्रयत्न
​लग्न मंडपात राडा; लव्ह मॅरेज केलेल्या जोडप्याच्या लग्नात पेट्रोल-डिझेल फेकून पेटवण्याचा प्रयत्न
img
Nandini khandare More
नाशिकच्या येवला शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि सुन्न करणारी बातमी समोर येत आहे. दोन महिन्यांपूर्वी पळून जाऊन कोर्ट मॅरेज केलेल्या एका जोडप्याचा आज हिंदू आणि वैदिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडत होता. मात्र, याच वेळी मुलीकडील नातेवाइकांनी जुना राग मनात धरून लग्न मंडपातच मोठा धुमाकूळ घातला आहे."

येवला शहरातील एका लॉन्सवर लग्न सोहळा सुरू असतानाच मुलीकडील लोकांनी मुलाच्या कुटुंबावर आणि आलेल्या पाहुण्यांवर थेट पेट्रोल अन् डिझेल फेकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला! लग्न मंडपात लहान मुले, महिला आणि पुरुष उपस्थित असताना घडलेल्या या प्राणघातक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.

​स्वतःचा बचाव करण्यासाठी मुलाकडील लोकांनीही या हल्ल्याचा प्रतिकार केला, ज्यामुळे दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या वादात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली."

महिला, लहान मुले आणि पुरुषांवर डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाल्याने संपूर्ण येवला शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी दोन्ही गटांतील १० ते १२ जणांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी येवला शहर पोलिसांत परस्परांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group