संतापजनक प्रकार! पोटच्या मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आईने  केली ३९ लाखांची मागणी
संतापजनक प्रकार! पोटच्या मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा मागे घेण्यासाठी आईने केली ३९ लाखांची मागणी
img
Nandini khandare More
सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी नव्हे, तर त्याच्याविरोधातील प्रकरणात तडजोड घडवून आणण्यासाठी तब्बल ३९ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे. आरोपीच्या पत्नीला कथितरीत्या ही ऑफर देण्यात आली. 

अधिक माहिती अशी की , स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीविरोधातला गंभीर गुन्हा मागे घेण्यासाठी चक्क पीडितेच्या आईनेच संशयित आरोपीच्या पत्नीकडे तब्बल ३९ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे.

या प्रकरणी पीडित मुलीची आई आणि अन्य एका महिलेविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना रंगेहात अटक केली आहे.

सोलापूर शहरात राहणाऱ्या दीपक राजगुरू या व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जुलै २०२६ मध्ये पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याखाली आरोपी दीपक राजगुरू हा मागील काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. यादरम्यान, काही दिवसांपूर्वी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने आरोपीच्या पत्नीशी संपर्क साधला आणि तो गुन्हा मागे घेण्याची तयारी दर्शवली. मात्र, हा गुन्हा मागे घेण्यासाठी तिने चक्क ३९ लाख रुपयांची मोठी मागणी केली.

पोक्सो प्रकरणातील आरोपी दीपक राजगुरू याच्या पत्नीने घडलेला सर्व प्रकार सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना जाऊन सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी तातडीने एक सापळा रचला. पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार, आरोपीच्या पत्नीने तडजोडीचा भाग म्हणून २५ हजार रुपये अल्पवयीन मुलीच्या आईला देण्यासाठी ठरवले.

ठरल्याप्रमाणे, आरोपीच्या पत्नीने २५ हजार रुपये सदर महिलेला दिले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे सांगितले. ज्यावेळी पीडित मुलीची आई आणि अन्य एक महिला ही रक्कम मोजत होती, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन्ही महिलांवविरोधात पोक्सो प्रकरणातील गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करत अटक करण्यात आली आहे.

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधातला गुन्हा मागे घेण्यासाठी पीडितीचे आईनेच संशयितच्या पत्नीकडून तब्बल 39 लाख रुपयांची खंडणी मागितल्यानं संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पीडित मुलीची आई आणि अन्य एका महिलेविरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापुरातील शहरात राहणाऱ्या दीपक राजगुरू या व्यक्तीविरोधात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार जुलै 2026 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी दीपक राजगुरू हा न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र काही दिवसापूर्वी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने आरोपीच्या पत्नीशी संपर्क साधत गुन्हा मागे घेण्याची तयारी दर्शवली. मात्र त्यासाठी 39 लाख रुपयांची मागणी केली. पोक्सो प्रकरणातील आरोपी दीपक राजगुरूच्या पत्नीने ही बाब सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सांगितली.

फौजदार चावडी पोलिसांनी या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी सापळा रचत 25 हजार रुपये अल्पवयीन मुलीच्या आईला देण्यासाठी सांगितले. आरोपीच्या पत्नीने 25 हजार रुपये महिलेले देत उर्वरित रक्कम नंतर देण्याचं सांगितलं. ज्यावेळी अल्पवयीन मुलीची आई आणि अन्य एक महिला ही रक्कम मोजत होते. त्यावेळी पोलिसानी त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांच्याविरोधात पोकसो प्रकरणातील गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group