धक्कादायक! पुणे कोर्टासमोर गोळीबाराचा थरार! कोयत्याने हल्ला, न्यायालय परिसरात खळबळ
धक्कादायक! पुणे कोर्टासमोर गोळीबाराचा थरार! कोयत्याने हल्ला, न्यायालय परिसरात खळबळ
img
Nandini khandare More

पुण्यातील न्यायालय परिसरात गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टासमोरच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा न्यायालय परिसरातच असा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या समोरच फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. थोड्यावेळापूर्वीच ही घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींकडून बंदूकीतून फायरिंग कऱण्यात आली, त्याशिवया कोयत्याने वारही करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वीच न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

कोर्टासमोरील ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून घटनास्थळाचा पंचनामा कऱण्याचे काम सुरू केले आहे. गोळीबार नेमका का झाला? याचा तपास पोलीस करत आहे. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसापूर्वी कोर्टाला उडून देण्याची धमकी देण्यात आली होता. 

इतर बातम्या
Nashik : FDA ची

Join Whatsapp Group