बिसलेरीच्या पाण्यावरून सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. देशातील लोकप्रिय बाटलीबंद पाणी ब्रँड बिसलेरीच्या गुणवत्तेवर FSSAI ने प्रश्न उपस्थित करत कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकरणानंतर बिसलेरी कंपनीनेही समोर येत आपली बाजू मांडली आहे. नेमकं बिसलेरीच्या पाण्यात काय आढळलं? FSSAI ने कोणती कारवाई केली आणि कंपनीने काय स्पष्टीकरण दिलं? जाणून घेऊया सविस्तर...
पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याचा ब्रँड बिस्लेरीने FSSAI च्या कायदेशीर कारवाई आणि पाण्याच्या नमुन्यांची चाचणी अयशस्वी झाल्याच्या वृत्तांबाबत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. तसेच, हे प्रकरण सुमारे १४ महिने जुने असल्याचे कंपनीने आपल्या बचावात म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, बिस्लेरीचे पाण्याचे नमुने दोन वेळा चाचणीत अयशस्वी ठरले आहेत. यानंतर सरकारी एजन्सी FSSAI ने खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. कंपनीचा खुलासा - या संदर्भात बिस्लेरी इंटरनॅशनलने सोमवारी एक निवेदन जारी केले आणि यासंदर्भात, हे प्रकरण १४ महिने जुने आहे. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी, FSSAI च्या टीमने बिस्लेरीच्या गोवा येथील प्लांटमधून एकूण ६ नमुने घेतले होते. यांपैकी ५ नमुने सर्व गुणवत्ता मानकांची पूर्तता करणारे होते. केवळ सहाव्या नमुन्याच्या प्राथमिक चाचणीत ब्रोमेटची पातळी प्रति लिटर १२ मायक्रोग्राम असल्याचे आढळून आले होते. जी प्रति लिटर १० मायक्रोग्रामच्या निर्धारित मर्यादेपेक्षा किंचित अधिक होती.
कंपनीने पूढे म्हटले आहे, "नोव्हेंबर २०२५ मध्ये अपील केल्यानंतर, संबंधित एक नमुना प्रयोगशाळेत पाठवण्यात आला, तेव्हा त्यात ब्रोमेट विहित मर्यादेत आढळले. मात्र, पॉलिन्यूक्लियर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असल्याचे आढळले. दोन्ही अहवालांमधील विसंगती पाहून, बिस्लेरीने त्याच बॅचची एका स्वतंत्र FSSAI-मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत पुन्हा चाचणी करून घेतली. यात, पाणी सर्व सुरक्षा मापदंडांवर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आढळले." दरम्यान, "पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही गुणवत्तेवर बारकाईने लक्ष ठेवतो आणि योग्य नियामक प्रक्रियेद्वारे हे प्रकरण सोडवण्यासाठी FSSAI सोबत सहकार्य करत राहू," असे कंपनीने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण ?
गोवा प्रकल्पाच्या प्रकरणात सुमारे ९ महिने शांतता राहिल्यानंतर २२ नोव्हेंबर २०२६ म्हणजेच रविवारी FSSAI ने दोन स्वतंत्र लॅब चाचण्यांत नमुने अयशस्वी ठल्याने बिस्लेरीविरुद्ध न्यायालयात खटला चालवण्यास मंजुरी दिल्याची घोषणा केली.