महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून, शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या सर्वांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नेमकं कोणत्या शहरात हा पक्षांतराचा प्रकार घडला? कोणत्या पक्षात या नेत्यांनी प्रवेश केला? जाणून घेऊया सविस्तर.
अकोल्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. शरद पवार गटातील अकोटचे शहराध्यक्ष आणि बारी समाजाच्या नेत्यांनी वंचितमध्ये पक्षप्रवेश केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. राज्याच्या राजकारणात 'वंचित बहुजन आघाडी'चे नेते प्रकाश आंबेडकरांच्या 'सोशल इंजिनिअरिंग'ची चांगलीच चर्चा होत असतेय.
प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने आता राज्यातील बारी समाजाला वंचितच्या चळवळीत अधिक जोमाने सामावून घेण्यासाठी पुढाकार घेतलाय. याचाच भाग म्हणून आज राज्यातील बारी समाजातील मोठा चेहरा असलेल्या डॉ. श्याम नेमाळे आणि अकोटच्या शरद पवार गटातील शहराध्यक्ष संदेश घनबहाद्दूर यांचा वंचितमध्ये पक्षप्रवेश झालाय. आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह अकोल्यात वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय. यासह ओबीसी व मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांचा देखील पक्षप्रवेश पार पडला.
यांनी केला पक्षप्रवेश : संदेश घनबहादुर हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोट शहराध्यक्ष आहे. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, गजानन गवई यांच्या नेतृत्वात अकोट शहरात आयोजित वंचितच्या कार्यक्रमात पक्ष प्रवेश घेतलाय. डॉ. श्याम नेमाळे हे बारी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष आहे. त्यांनी देखील वंचितचा झेंडा हाती घेतलाये.
ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला अकोट शरद धक्का वंचितने दिला आहे. यावेळी इतर ओबीसी व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते देखील वंचित पक्षात सहभागी झाले. यावेळी डॉ. श्याम नेमाळे आणि समाजातील नेते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकरांशी बारी समाजाच्या प्रश्नावर सविस्तर आणि सखोल चर्चा केलीय.