दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! सोन्याच्या दरात मोठी घसरण ! १ तोळा सोने तब्बल ''इतक्या''  रुपयांनी घसरले
दिवाळीपूर्वी सोनं-चांदी स्वस्त! सोन्याच्या दरात मोठी घसरण ! १ तोळा सोने तब्बल ''इतक्या'' रुपयांनी घसरले
img
Nandini khandare More
सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळत असून, सोन्याच्या किमतीत प्रति तोळा १,९०० रुपयांची घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, १८ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर वेगवेगळे असतात. तसेच शहरानुसार किमतींमध्येही फरक असू शकतो. अशा परिस्थितीत आज सोनं आणि चांदी नेमकं किती रुपयांनी स्वस्त झालं? १० ग्रॅम सोन्याचे ताजे दर काय आहेत? जाणून घेऊया सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून सोन्यासह चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करताना ग्राहकांचे लक्ष दरांकडे लागले आहे. आता दिवाळीपूर्वी सोन्याच्या भावात घट झाल्याने दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना ही चांगली संधी वाटू शकते. सध्या १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाख ४२ हजार ४८० रुपये इतकी आहे. 

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. एक किलो चांदीच्या किमतीत ५ हजार रुपयांची घट झाली असून, सध्या तिचा दर २ लाख २० हजार रुपये इतका आहे. दरातील या बदलामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे. कारण दागिन्यांच्या अंतिम किमतीत जीएसटी आणि घडणावळ शुल्काचाही समावेश होतो. त्यामुळे खरेदी करताना संपूर्ण खर्चाची माहिती घेऊनच निर्णय घ्यावा.
इतर बातम्या
Join Whatsapp Group