नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मुंगसरे-मखमलाबाद रोडवर काल रात्री झालेल्या भीषण अपघातात क्रेटा कारचा चक्काचूर झाला असून, कारमधील एक जण ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, काल रात्रीच्या सुमारास गिरणारेहून मखमलाबादकडे डी.डी. 01 डब्ल्यू. 9092 या क्रमांकाची ट्रक येत होती. त्याचवेळी ट्रकच्या पाठिमागून एम.एच.15 जे.एम.6462 या क्रमांकाची क्रेटा कार भरधाव वेगात येत होती. यशवंतनगरजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात क्रेटा कार ट्रकला पाठिमागून जोरात धडकली. या अपघातात कारमधील एक जण ठार झाला असून, कारचालक गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा चक्काचूर झाला आहे.
अपघातातील मृत इसमाचे आणि जखमीचे नाव समजले नसून, याप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करीत आहे.