श्री त्र्यंबकेश्वर येथे आज व उद्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ५० पोलीस अंमलदार व ४ अधिकारी तैनात
श्री त्र्यंबकेश्वर येथे आज व उद्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ५० पोलीस अंमलदार व ४ अधिकारी तैनात
img
दैनिक भ्रमर
त्र्यंबकेश्वर :- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी राज्यभरातून व परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याकडून विशेष सुरक्षा व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आरसीपी पथकासह एकूण ५० पोलीस अंमलदार व ४ पोलीस अधिकारी यांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर, कुशावर्त तीर्थ, प्रमुख चौक, वाहनतळ, बसस्थानक तसेच भाविकांची वर्दळ असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS) महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा तपासणी करण्यात आली आहे.

गर्दीचे योग्य नियोजन, वाहतूक सुरळीत ठेवणे, चोरी व पाकीटमारीसारख्या घटनांना प्रतिबंध करणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

भाविकांनी दर्शनासाठी येताना पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, आपली मौल्यवान वस्तू व साहित्याची काळजी घ्यावी तसेच कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांचे दर्शन सुरक्षित, शांततेत व सुरळीत पार पडावे, यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिक व भाविकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group