७ ऑक्टोबर २०२६
नाशिक : - नाशिक महानगरपालिकेने शहरातील पुन्हा एक अनधिकृत धार्मिक स्थळ हटविले असून आज पहाटे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ही धडक कारवाई करण्यात आली.
शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी खंबीर भूमिका घेतली आहे. शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविली जात आहे. यामध्ये शहरातील काही भागांमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जात आहे.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, शहरातील गंगापूर रोडवरील कलानगर परिसरात गोदावरी नदी किनारी हजरत पीर सैय्यद अलीबाबा या नावाने एक धार्मिक स्थळ गेल्या काही दिवसांपासून उभारण्यात आले होते.
या परिसरातील रहिवाशांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत अखेर आज महानगरपालिकेने कारवाई केली आहे. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, अमित रंजन, भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दखणे, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी चंदन घुगे, आशिष संधान व इतर कर्मचार्यांसह अतिक्रमण पथक घटनास्थळी पोहोचले. या ठिकाणी नियमाप्रमाणे पूजाअर्चा करून नंतर संबंधितांना कल्पना देत हे स्थळ हटविण्यात आले. हे स्थळ हटवण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला दोन तासांपेक्षा अधिकचा कालावधी लागला.
Copyright ©2026 Bhramar