मुंबईत
मुंबईत "या" सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर गोळीबार
img
दैनिक भ्रमर

मुंबई :- अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर दुचाकीहून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. मुंबईतील जुहू परिसरातून फुटबा‍ॅल‍ म‍ॅच खेळून परततांना ही घटना घडली.

या घटनेत टायगर श्रॉफला कुठलीही दुखापत झाली नसून त्याचा कार चालक आणि एका रिक्षाचालकाला दुखापत झाल्याचे समजते. अचानक गोळीबाराचा आवाज आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सगळेजण सैरावैरा धावत सुटले.

जखमी कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरु झाले असून घटनास्थळी पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group