११ सप्टेंबर २०२६
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नगरसेविकेच्या राहत्या घराजवळ उभी असलेली 14 लाख रुपये किमतीची ह्युंडाई कंपनीची क्रेटा कार चोरून नेल्याची घटना सिडकोत घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हार्दिक रमेश देवांग (रा. कार्तिक सेक्टर, अश्विननगर) यांनी राहत्या घराजवळ एमएच 15 जेएस 8212 या क्रमांकाची 14 लाख रुपये किमतीची ह्युंडाई कंपनीची क्रेटा कार उभी केली होती.
ही कार अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागूल करीत आहेत.
Copyright ©2026 Bhramar