गोविंदनगरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत 33 वर्षीय तरुण ठार
गोविंदनगरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत 33 वर्षीय तरुण ठार
img
दैनिक भ्रमर

मुंबई-आग्रा महामार्गावरील गोविंदनगर परिसरातील डेटा मॅटिकसमोरील सर्व्हिस रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत 33 वषय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

आज (दि. 14) सायंकाळी झालेल्या या अपघातात किरण चांगदेव नरोडे (वय 33, रा. साईदर्शन अपार्टमेंट, गणेशनगर, उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत) गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. गणपती स्थापनेच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे पिंपळगाव बसवंत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण नरोडे हे एमएच 15 जीडी 1397 क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवरून मुंबईकडून मालेगावच्या दिशेने सर्व्हिस रोडने जात होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास डेटा मॅटिक्स समोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या उजव्या हातालाही दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच त्यांचे भाऊ सुरज नरोडे यांनी किरण यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group