नाशिक - कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिकचे कृषी उत्पन्न बाजार समिती पेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती त्र्यंबकेश्वर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक असे विभाजन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येथे सध्या शासकीय प्रशासक कार्यरत आहेत. येथे आता प्रशासक ऐवजी अशासकीय प्रशासक मंडळ स्थापन करण्यात आले आहे.
या अशासकीय प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांची निवड करण्यात आली आहे. या अशासकीय मंडळाची स्थापना करण्यात आली असून याला महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधील कलम १५ अ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप, सचिन ढिकले आणि बापू पिंगळे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नेमणूक ६ महिने किंवा बाजार समितीची निवडणूक होई पर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत असणार आहे. अप्रशासकीय मंडळाच्या स्थापनेचे आदेश राज्याचे पणन संचालक संजय कदम यांनी १ ऑक्टोबर रोजी काढले आहेत