अन्नपदार्थांमध्ये झुरळे आढळली; नाशिक मधील
अन्नपदार्थांमध्ये झुरळे आढळली; नाशिक मधील
img
दैनिक भ्रमर

नाशिक :- विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने एफडीएच्या पथकाने नाशिक मधील एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेच्या कॅन्टीनमध्ये तपासणी केली.

संदिप फाउंडेशन येथील ‘ओक्रा कॅन्टीन’मध्ये अस्वच्छता, अन्नपदार्थांमध्ये झुरळे व इतर कीटक आढळून आल्याने या कॅन्टीनचा परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित कॅन्टीनमध्ये अस्वच्छतेच्या तक्रारी तसेच अन्नपदार्थांमध्ये झुरळे व कीटक आढळून आल्याने अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) संदीप देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिक भड, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली.

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा



इतर बातम्या
Join Whatsapp Group