मनपाच्या वतीने महिलांसाठी
मनपाच्या वतीने महिलांसाठी "हा" उपक्रम राबविला जाणार
img
Nandini khandare More
नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध कामानिमित्त महिला व मुलींची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. शहरातील मॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, व्यावसायिक संकुले व इतर आस्थापनांमध्ये स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध असते.

महिलांना आवश्यकतेच्या वेळी स्वच्छ, सुरक्षित व सहज उपलब्ध स्वच्छतागृहाची सुविधा मिळावी तसेच शहरातील स्वच्छता व महिला-सुविधांच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेमार्फत सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्व संबंधित मॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, व्यावसायिक संकुले व इतर संबंधित आस्थापनांना खालीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

1. आस्थापनामध्ये उपलब्ध असलेले महिलांचे स्वच्छतागृह महिलांसाठी विनामूल्य वापरास उपलब्ध करून द्यावे.
2. स्वच्छतागृहाच्या वापरासाठी महिलांकडून कोणतेही शुल्क आकारू नये.
3. स्वच्छतागृहामध्ये नियमित स्वच्छता करून पुरेसा पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था व आवश्यक स्वच्छता साहित्य उपलब्ध ठेवावे.
4. स्वच्छतागृहाची सुविधा महिलांना सहज लक्षात यावी यासाठी योग्य व दर्शनी ठिकाणी
“महिलांसाठी स्वच्छतागृह – विनामूल्य वापर”  असा स्पष्ट फलक लावावा.
5. स्वच्छतागृहाची नियमित देखभाल व स्वच्छता राखून महिलांना सुरक्षित व सन्मानपूर्वक वापर करता येईल, याची दक्षता घ्यावी.
6. सदर उपक्रमाबाबत आस्थापनातील संबंधित कर्मचारी/व्यवस्थापनास आवश्यक सूचना देऊन महिलांना स्वच्छतागृह वापरण्यासाठी सहकार्य करावे.
7. नाशिक शहरामध्ये महिला-स्नेही व स्वच्छ वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या या उपक्रमास संबंधित आस्थापनांनी सहकार्य करावे.

वरील उपक्रम हा नागरिकांना आवश्यक मूलभूत स्वच्छता सुविधा सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असून, सर्व संबंधित आस्थापनांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group