नाशिक :- द्वारका सर्कल, नाशिक येथे “Construction of Interchange at Dwarka Circle, Nashik in the State of Maharashtra on EPC Mode” हे महत्त्वाचे व कालबद्ध पायाभूत सुविधा काम सुरू आहे. या कामामुळे द्वारका जंक्शन येथील वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबई-धुळे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने या कामास प्राधान्य देण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने ५०० मी.मी. व्यासाची गुरुत्ववाहिनी अडथळा ठरत असल्याने, यापूर्वी सदर गुरुत्ववाहिनी MSIDC मार्फत स्थलांतरित करण्यात आली होती. आता या ठिकाणी काम पूर्ण झाले असून, ही गुरुत्ववाहिनी पूर्ववत स्थितीत आणण्यासाठी नव्याने टाकण्यात आलेली DI K9 / MS-DI गुरुत्ववाहिनी विद्यमान गुरुत्ववाहिनीशी जोडणे (Cross-Connection) आवश्यक आहे.
हे क्रॉस-कनेक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित स्लॅबचे काम पूर्ण करणे तसेच मुंबई-धुळे मार्गावरील वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्यास मदत होणार आहे.
या क्रॉस-कनेक्शनचे काम विद्यमान गुरुत्ववाहिनीवर करावयाचे असल्याने, कामाच्या सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या योग्य अंमलबजावणीसाठी विद्यमान गुरुत्ववाहिनीचा तात्पुरत्या स्वरुपात पाणीपुरवठा बंद (Shutdown) करणे अपरिहार्य आहे.
MSIDC यांनी पत्राद्वारे या कामासाठी १२ तासांचा Shutdown कालावधी आवश्यक असल्याचे कळविले आहे. हे काम तातडीने व प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री, साहित्य व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून काम निर्धारित Shutdown कालावधीत पूर्ण करण्याचे MSIDC यांनी नमूद केले आहे.
यास्तव, द्वारका सर्कल इंटरचेंजचे कालबद्ध व महत्त्वाचे काम तसेच दि.१० ऑगस्ट रोजी कुंभ आयुक्त, महानगरपालिका आयुक्त व पोलीस आयुक्त, नाशिक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीदरम्यान देण्यात आलेल्या सूचनांचा विचार करता, या ५०० मी.मी. व्यासाच्या गुरुत्ववाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्यासाठी पाणीपुरवठा बंद (Shutdown) ठेवणे आवश्यक आहे. तसेच नाशिक शहरातील नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील खालील महत्वाची व पाणी पुरवठा विषयक अत्यावश्यक कामे करणे आवश्यक व क्रमप्राप्त आहे.
१)नाशिक पुर्व विभागात प्र.क्र. ३० मधील चढढा पार्क जलकुंभ भरणारी गुरुत्व वाहीनी वरील ४०० मी.मी. व्यासाचा व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे.
२)नाशिक पुर्व विभागात प्र.क्र. ३० मधील मुख्य ७०० मी.मी. व्यासाच्या गुरुत्व वाहनीवरील व्हॉल्व्ह ग्रिसिंग करणे.
३)नाशिक पुर्व विभागात गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथे ७०० मी.मी. व्यासाच्या रॉ व्हॉटर पाईपलाईनवर व्हॉल्व्ह बसविणे.
४)नाशिक पुर्व विभागात कल्पतरू नगर जलकुंभ येथील आउटलेटवरील ४०० मी.मी. व्यासाचा व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे.
५)नविन नाशिक विभागातील प्र.क्र.३१ मधील भवानी माता जलकुंभावरील ४५० मी.मी. इनलेट व आऊटलेट व्हॉल्व्ह रिपअर करणे.
६)नविन नाशिक विभागातील प्र.क्र.२९ मधील पवन नगर टाकी येथील ३०० मी.मी. व्यासाचा व्हॉल्व्ह रिपअर करणे.
७)नविन नाशिक विभागातील प्र.क्र.२४ मधील आर.डी.सर्कल येथे ४५० मी.मी.पाईपलाईनवर २ ठिकाणी लिकेज काढणे.
८) नाशिकरोड विभागात गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथील ७०० मी.मी. व्यासाच्या पंपाच्या लाईनला विहीतगांव नवीन जलकुंभाकरीता पाणी देण्यासाठी ४५० मी.मी. व्यासाच्या राईझींग मेन लाईनला क्रॉस कनेक्शन करणे.
९) नाशिकरोड विभागात प्र.क्र. २२ विहीत गांव नवीन जलकुंभाच्या इनलेट लाईनला ४५० मी.मी. व्यासाचा स्लूस व्हॉल बसविणे व तसेच जुन्या जलकुंभाच्या ३०० मी.मी. व्यासाच्या इनलेट लाईनला स्लूस व्हॉल बसविणे.
१०) नाशिकरोड विभागात प्र.क्र. २१ मधील छत्रपत्री शिवाजी महाराज पुतळा येथे ४५० मी.मी व्यासाची वितरण वाहीनी १५० मी.मी. व्यासाची वाहीनीचे अमृत २.० अंतर्गत काम करणे.
११) नाशिकरोड विभागात गांधीनगर ते नाशिकरोड ९०० मी.मी व्यासाची गुरुत्व वाहीनी वॉश आऊट करणे.
१२) पंचवटी फिल्टरेशन प्लँन्ट जवळील एमएसईबी आवारातील ५ लाईन शिफ्ट करणेसाठी क्रॉस कनेक्शन करणे.
१३) सातपुर विभागातील पपया नर्सरी चौकात १२०० मी.मी. x ६०० मी.मी.व्यासाची पाईपलाईन क्रॉस कनेक्शन करणे.
१४) अशोक नगर जलकुंभासाठी नवीन पाईपलाईन जोडणेसाठी क्रॉस कनेक्शन करणे.
१५) कॅनॉल रोड प्र.क्र. ०८ डी मार्ट समोर काळेरोड पीएससी पाईपलाईन गळती बंद करणे.
१६) सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २६ मधील जाधव संकुल येथे ३०० मी मी व्यासाच्या लाईन वर व्हाॅल्व बसविणे.
१७) सातपूर विभागातील प्र. क्र. ९ मधील धुर्वनगर बस स्टॉप विशाल ट्रेडर्स प्लंबिंग हार्डवेअर दुकानासमोर ५०० मीमी.पीएससी पाईप लाईन लिके्ज बंद करणे.
पाणी पुरवठा विषयक वरील महत्वाची व अत्यावश्यक स्वरुपाची कामे करण्यासाठी मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. नाशिक शहरातील लोकप्रतिनीधी व नागरिकांनी नोंद घ्यावी व नाशिक महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.