नाशिक दौर्‍यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ओझर विमानतळावर आगमन
नाशिक दौर्‍यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ओझर विमानतळावर आगमन
img
Nandini khandare More
राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा यांनी केले स्वागत
नाशिक, दिनांक 31: नाशिक - त्र्यंबकेश्‍वर सिंहस्थ कुंभमेळा 2027  सोहळ्याची सुरुवात ध्वजारोहणाने होणार असून या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी राज्यपाल डॉ. जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक ऊईके, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, खासदार भास्कर भगरे,आमदार दिलीप बनकर, आमदार सुहास कांदे, उपमहापौर विलास शिंदे, जलसंपदा सचिव एकनाथ डवले, अतिरिक्त पोलिस महासंचालक रितेशकुमार, हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिरकुमार पात्रा, स्कूल ऑफ आर्टिलरीचे कमांडंट लेफ्टनंट जनरल एन. एस. सराना, एअर कमाडोर विक्रम सिंग, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group