महाराष्ट्रावरही 'अर्णब' चक्रीवादळाचं संकट? १५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; पाहा तुमचा जिल्हा यादीत आहे का!
महाराष्ट्रावरही 'अर्णब' चक्रीवादळाचं संकट? १५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट; पाहा तुमचा जिल्हा यादीत आहे का!
img
Nandini khandare More
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ अतितीव्र चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  राज्यातील १५ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे? पावसाचा जोर किती असणार आणि हवामान विभागाने नागरिकांना काय सूचना दिल्या आहेत? जाणून घ्या हवामानाचा सविस्तर अंदाज.

विदर्भासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामानाचा विचार करून संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या उर्वरित भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, कमाल तापमानातही घट होऊ शकते.

कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट? हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात, तर विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येही विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.


‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘अर्णब’ अतितीव्र चक्रीवादळ बुधवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि यानमच्या किनाऱ्यावर धडकले. या चक्रीवादळामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आज चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण आणि पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group