मोठी बातमी !  अभिजीत  दिपकेंनंतर नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी ! अभिजीत दिपकेंनंतर नेहा बोरा पोलिसांच्या ताब्यात
img
Nandini khandare More

दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'कॉक्रोच जनता पार्टी' पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज संध्याकाळी ५:०० वाजता 'तिरंगा मार्च' काढण्याची घोषणा केली. आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी दीपकेंना ताब्यात घेतलंय. सकाळी पोलिसांनी दीपके यांना त्यांच्या घरी जाऊन नोटीस दिली होती. त्यानंतरही दीपके आंदोलनासाठी सेंट्रल पार्कला निघाले होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.

दरम्यान आता दिल्ली पोलिसांनी 'सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्यानंतर नेहा बोरालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कॉक्रोच जनता पक्षाकडून कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा आंदोलन पुकारलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी अभिजीत दीपके आंदोलन करणार होते, त्याआधीचं दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. त्यानंतर दिल्लीच्या मंडी परिसरात AISA आणि डाव्या पक्षांकडून आंदोलन करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत होतं. दरम्यान कनॉट प्लेसवर आंदोलक हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या प्रमाणात जमत आहेत.

तिरंगा रॅलीची सुरुवात होण्यापूर्वीच ही मोठी घडामोड समोर आली आहे. अभिजीत दिपके यांच्याकडून ‘लेहरा दो तिरंगा रॅली’चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी सीजेपीचे समर्थक मोठ्या संख्येने जमले आहेत. पण यावेळी अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता प्रमुख चेहरा म्हणजे नेतृत्त्व करणारा चेहराच ताब्यात गेल्यामुळे आता या रॅलीचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे मोठे कार्यकर्ते जमले आहेत. त्याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. फक्त ११ जणांनाच तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अटकेच्या निषेधार्थ या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पण सीजेपीचे कोणतेही मोठे चेहरे आता आंदोलनस्थळी पोहचलेले नाहीत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group