अत्यंत भयानक !  रात्री देवीचा गरबा खेळल्या, पहाटे हैवान पतीने झोपेतच संपवलं
अत्यंत भयानक ! रात्री देवीचा गरबा खेळल्या, पहाटे हैवान पतीने झोपेतच संपवलं
img
Nandini khandare More
गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक आणि भयन्कर घटना समोर येत असून आता एका हैवान पतीने  आपल्या पत्नीची अत्यंत क्रूरपाने हत्या केल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहिणी मुकेश कुंभकर्ण (वय 42) असे मृत महिलेचे नाव आहे.

सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्या झोपेत असताना आरोपी पती मुकेश कुंभकर्ण याने त्यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार केले. या हल्ल्यात रोहिणी यांचा मृत्यू झाला. पती-पत्नीमध्ये मागील सहा ते सात महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. याचा वादातून मुकेश कुंभकर्ण याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. 

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी मुकेश सकाळी सातच्या सुमारास स्वतः दुचाकीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी रोहिणी यांनी गजानन कॉलनीतील महिलांना एकत्र करून उत्साहात देवीची स्थापना केली होती. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत त्या इतर महिलांसोबत पारंपरिक गरबा खेळल्या आणि त्यानंतर आनंदात घरी झोपण्यासाठी गेल्या. 


मात्र, सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रोहिणी गाढ झोपेत असताना, संशयखोर मुकेशने त्यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने एकापाठोपाठ एक जोरदार वार केले. या भीषण हल्ल्यात रोहिणी गंभीर जखमी होऊन त्या जागीच मरण पावल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच रोहिणी कुंभकर्ण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामधून आणखी कोणती माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. दरम्यान, सध्या पोलिसांकडून त्यांच्या पातळीवर या प्रकरणाचा तपास सुरु आहे. मुकेश कुंभकर्ण याच्या चौकशीतून आणखी कोणती नवी माहिती समोर येणार का, याकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर कन्नड शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहिणी कुंभकर्ण यांच्या हत्येची माहिती समजल्यानंतर अनेक स्थानिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. आता येणार्‍या काळात पोलिसांकडून रोहिणी यांचा मारेकरी मुकेश कुंभकर्ण याच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group