धक्कादायक ! आयटी इंजिनिअर विवाहितेची आत्महत्या; शेवटच्या चिठ्ठीत धक्कादायक खुलासा
धक्कादायक ! आयटी इंजिनिअर विवाहितेची आत्महत्या; शेवटच्या चिठ्ठीत धक्कादायक खुलासा
img
Nandini khandare More
कौटुंबिक हिंसाचार, आणि हुंडाबळीच्या अणे धक्कादायक घटना सध्या घडत असून आता पुन्हा एकदा पुण्यातून एक संतापजनक घटना समोर  आली आहे. पुण्यामध्ये सासरच्या छळाला कंटालून आयटी इंजिनिअर महिलेने आत्महत्या केली. पुण्यातील मुंढवामध्ये ही घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या नवऱ्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण पगार देण्यासोबत माहेरचे घर नावावर करून देण्यासाठी या महिलेचा छळ केला जात होता. सततच्या छळाला कंटाळून या महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिष्णा राहुल सकपाळ असं आत्महत्या केलेल्या आयटी इंजिनिअर महिलेचे नाव आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास त्रिष्णाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्रिष्णा मुंढव्यातील केशवनगर भागात राहत होती. माहेरहून पैसे आण, घर नावावर करून दे आणि घटस्फोटासाठी त्रिष्णाचा तिचे सासरची मंडळी शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. या छळाला कंटाळून त्रिष्णाने आयुष्य संपवलं.

याप्रकरणी त्रिष्णाच्या वडिलांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी तिचा राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेसासू शकुंतला साळुंके या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे.

त्रिष्णाचा विवाह २०१८ मध्ये राहुल सकपाळ याच्याशी झाला होता. लग्नात तिच्या माहेरच्यांनी १३ तोळे सोन्याचे दागिने तिला दिले होते. त्रिष्णा ही एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. संपूर्ण पगार देण्यासह माहेरचे घर सासूच्या नावावर करण्यासाठी तिचा सतत छळ सुरू होता. तसेच, सासऱ्यांनी तिच्या नावावर एक कोटीचे घर घेऊन देण्याचा तगादा लावला होता. वारंवार होणाऱ्या मारहाण आणि छळामुळे त्रिष्णा आणि तिचान नवरा २०२१ मध्ये केशवनगर येथे वेगळे राहू लागले.

वेगळं राहात असताना पतीने तिथेही मारहाण करून तिला घराबाहेर काढलं होतं. यानंतर ती माहेर निघून गेली. मात्र, पतीने थेट घटस्फोटासाठी न्यायालयात दावा दाखल केला आणि तिला मोठा धक्का बसला. २९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्रिष्णा हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात पती, सासू, सासरे, नणंद आणि आजेससू यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून, तेच माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत, असा उल्लेख तिने केला आहे. याप्रकरणी तिचे वडील बाळकृष्ण निकम (वय ७४, रा. केशवगर) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पती राहुल संजय सकपाळ, सासू वैशाली संजय सकपाळ, सासरे संजय मनोहर सकपाळ, नणंद शैली संजय सकपाळ आणि आजेससू शकुंतला साळुंखे (सर्व रा. डिफेंस कॉलनी, हडपसर) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group