राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ''या'' २ प्रमुख योजना कायमच्या बंद
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ''या'' २ प्रमुख योजना कायमच्या बंद
img
Nandini khandare More
राज्यसरकार कडून सध्या राज्यातील अनेक महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारकडून शालेय शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या २ योजना कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 'पाठशाळा आणि संस्कृत विकासासाठी अनुदाने' आणि 'इतर विशेष शाळा' या दोन योजनांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून या योजनांवर कोणताही निधी खर्च झालेला नव्हता आणि त्यांचा प्रत्यक्ष वापरही होत नव्हता. त्यामुळे योजनांचे सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने सरकारने या योजना अधिक्रमित (बंद) करण्याचा निर्णय घेतला आहे.

योजना का बंद करण्यात आल्या? राज्यात बदलत्या शैक्षणिक व प्रशासकीय परिस्थितीनुसार उपलब्ध निधीचा योग्य आणि परिणामकारक वापर व्हावा, यासाठी मुख्य सचिवांच्या सूचनेनुसार ३ ऑगस्ट रोजी कल्याणकारी योजनांची पुनर्रचना करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नेमकं काय समोर आले? पाठशाळा व संस्कृत विकास या योजनेअंतर्गत २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत एक रुपयाचाही खर्च झालेला नाही. इतकेच नाही तर २०१७-१८ पासून या योजनेसाठी एकही नवा प्रस्ताव प्राप्त झालेला नव्हता. तर इतर विशेष शाळा या योजनेअंतर्गत २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत कसलाही निधी खर्च झाला नाही

उपयोगिता संपल्याने निर्णय: या दोन्ही योजनांची दीर्घ काळापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. तसेच यांच्याशी जुळणाऱ्या इतर अनेक योजना सध्या कार्यरत आहेत. सध्याच्या काळात या योजनांची गरज आणि उपयोगिता मर्यादित राहिल्याने, राज्य सरकारने या दोन्ही योजना अधिक्रमित करून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group