मनपाच्या विषय समित्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध
मनपाच्या विषय समित्या सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- महानगरपालिकेच्या विषय समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक पदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पाचही विषय समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. यावर गुरुवार आणि शुक्रवारी होणार्‍या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती, शहर सुधार समिती, वैद्यकीय सहाय्यक व आरोग्य समिती, विधी समिती, शिक्षण समिती या ५ समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक ८ व ९ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी तथा पिठासन अधिकारी  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहेत.

त्या समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज  दाखल करण्याची मंगळवारी शेवटची मुदत होती. त्यात महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी कोमल प्रताप मेहरोलीया, उपसभापती -चित्रा जगन्नाथ तांदळे, शहर सुधार समितीसाठी सभापतीपदासाठी जागृती दत्तू गांगुर्डे, उपसभापती -जयंत अशोक जाचक, वैद्यकीय सहाय्यक व आरोग्य समिती करीता सभापती -पुनम योगेश महाले, उपसभापती -सतीश आनंदराव निकम, विधी समिती करीता सभापती -जुई प्रणव शिंदे ,उपसभापती -अंकिता महेंद्र शिंदे, शिक्षण समिती करीता सभापती -शरद द्रौपदा चिंतामण मोरे, उपसभापती -सोनाली तुषार भंदुरे  आदींचे  अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती नगरसचिव संजय नेरकर यांनी दिली.

ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group